सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वेळ सांगेल लवंगी की ॲटम बॉम... फडणवीस

काल राष्ट्रीय गृह सचिवांना भेटला नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कुठला बॉम फुटला जाईल.. मात्र कळलं की देवेंद्र फडणवीस हे ओला- बिना वातीचा लवंगी फटाका घेऊन आहेत.-- संजय राऊत

Snehal Joshi. MH
  • Mar 24 2021 4:39PM
 
 
 महाराष्ट्राच्या राजकारणात रोमांचक आणि चिंताजनक घटना घडत आहेत. कोणी याला लवंगी फटाका म्हणतात तर कोणी ॲटम बम.... मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यावर काहीही प्रतिक्रिया देत नाहीत. तेव्हा या राजाचे हुकूमदार सिपे सालार पैरवी करायला मोकळे आहे. प्रवक्ता या नात्याने जबाबदारी सांभाळत आहेत.
 कालच्या घटनाक्रमात मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर केंद्रीय गृह सचिवांना दिल्ली ला भेटायला गेलेले देवेंद्र फडणवीस हे बदली आणि नियुक्त्याचे रॅकेटचा चिटा -पिटा घेऊन गेले होते. आणि आज भारतीय जनता पार्टीच्या बाकी शिष्ट मंडळा सोबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग यांना भेटायला सकाळी 9 वाजता मुंबई राजभवनात गेले होते. ही माहिती मिळताच शिवसेनेचे आमदार प्रवक्ता संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. 
 पत्रपरिषदेत ते म्हणाले की आम्हाला असं वाटलं होतं की काल राष्ट्रीय गृह सचिवांना भेटला नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कुठला बॉम फुटला जाईल.. मात्र कळलं की देवेंद्र फडणवीस हे ओला- बिना वातीचा लवंगी फटाका घेऊन गेले होते. आणि आज ते विधान भवन म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आहेत.
 
 दरम्यान विधान भवनात भगतसिंग कोशारी यांना भाजपचे आमदार सुधारक मुनगंटीवार यांनी महा विकास आघाडीचे 100 असफल कार्य कोणते ते तयार करून त्याचे निवेदन सुपूर्त केले. आणि या शिष्टमंडळाने राज्यपालांना निवेदन केले की 25 ऑगस्ट नंतर घडत आलेला या घटनाक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणती भूमिका घेतली याचा अहवाल मागवा. ते बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं कराव असेही निवेदन केले.
 
 दीड तास निवेदन सुपूर्त करून चर्चा झाल्यानंतर विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी संजय राऊत यांना उत्तर देताना म्हटले की वेळच सांगेल की आम्ही लवंगी फटाका फोडला की ॲटम बॉम....
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार