सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आखेर उध्दवाने देवाचे दार उघडल्याने भाजप कार्यकर्ता ने केला अनंद उत्सव

भाजप कार्यकर्ता ने केला अनंद उत्सव

Sudarshan MH
  • Nov 17 2020 10:54AM
पिंपरी । दिपक चव्हाण पुणे

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घंटानाद, शंखनाद आणि महाआरती अशी आंदोलने करण्यात आली. अखेर राज्य सरकारला धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यापार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने आनंदोत्सव आणि ठिकठिकाणी महाआरती सोहळा आयोजित करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली आळंदीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर ते चिंचवडमधील श्रीमान महासाधू मोरया गोसावी मंदिरापर्यंत सर्व ग्रामदैवतांच्या मंदिरांसह सर्वधर्मिय प्रार्थनास्थळांमध्ये सोमवारी भाजपातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 
यावेळी महापौर माई ढोरे, महिला प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, प्रदेश सरचिटणीस अमित गोरखे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विजय फुगे, राजू दुर्गे, माजी महापौर नितीन काळजे, राहूल जाधव, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका मोनाताई कुलकर्णी, करुणा चिंचवडे, संगीता भोंडवे, नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, प्रभाग स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, दिनेश यादव, पांडुरंग भालेकर, विनोद तापकीर, विठ्ठल भोईर, संदिप गाडे, संदिप नखाते,
युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चौंधे, प्रदेश युवा उपाध्यक्ष अनुप मोरे,
महीला अध्यक्ष उज्वला गावडे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, प्रमोद ताम्हणकर, चिंचवड-किवळे मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे, शहर उपाध्यक्ष काळूराम बारणे, धनंजय शाळीग्राम, विनोद मालू, संजय पटनी, सुरेश पाटील, हरीभाऊ चिंचवडे, दिपक गावडे, नारायण लांडगे, पांडूरंग चिंचवडे, देवदत्त लांडे, मिथुन बोरगांव, राहुल मोकाशी, स्वप्निल भोईर, राजू लांडगे यांच्यासह कुंदा भिसे, पल्लवी वाल्हेकर, दिपाली धानोकर, रेखा कडाली, सुमन जांभूळकर, रंजना चिंचवडे, प्रतीभा चिंचवडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते  ‘महाआरती व आनंदोत्सवात’ सहभागी झाले होते.



भाजपाच्या आंदोलनांचे यश…
आमदार महेश लांडगे म्हणाले की, लॉकडाऊन शिथिल झाल्या नंतर संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू आणि मंदिर बंद असे काळे चित्र उभे केले होते. या निंदणीय निर्णयाविरोधात आणि श्रद्धास्थानं असलेली मंदिरं ताबडतोब उघडावीत या मागणीकरिता महाराष्ट्रातील प्रमुख धर्माचार्य, साधु-संत, सर्व धार्मिक संस्था-संघटना एकत्र येत भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या नेतृत्वात राज्यव्यापी लाक्षणिक उपोषणे व आंदोलनं करण्यात आली होती. शेवटी भारतीय जनता पार्टीने केलेल्या या आंदोलनांना व संघर्षाला यश मिळाले आहे. त्यामुळे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर  तब्बल नऊ महिन्यानंतर सर्वधर्मीय मंदिरे उघडण्यात आली आहेत. माऊलींची आळंदी ते मोरया गोसविंचे चिंचवड व्हाया भोसरी मतदार संघातील सर्व ग्रामदैवत असा दर्शन-आरती प्रवास केला.



…याठिकाणी साजरा केला आनंदोत्सव!
श्रीक्षेत्र आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिर, भोसरी मतदार संघातील टाळगाव चिखली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मोशीतील नागेश्वर मंदिर, जाधववाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, दिघीतील दत्तमंदिर, भोसरीतील महादेव मंदिर, इंद्रायणीनगर येथील वैष्णोमाता मदिर, नेहरुनगर येथील गणपती मंदिर, रुपीनगर-तळवडे येथील घारजाई मंदिर यांसह चिंचवड विधानसभा मतदार संघातील श्रीमान महासाधू मोरया गोसावी मंदिराध्ये महाआरती आणि आनंदोत्सव उपक्रमाचा समापोर करण्यात आला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार