सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*रेमडेसिविर पाठोपाठ आता ऑक्सिजनचाही काळाबाजार; काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्याच्या ताबडतोब मुसक्या बांधा*

काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्याच्या ताबडतोब मुसक्या बांधा

Nandurbar. MH
  • Apr 20 2021 11:30AM
सुदर्शन न्यूज. केतन रघुवंशी. नंदुरबार
नंदुरबार - रेमदेसिविर पाठोपाठ आता ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण करून रॅकेट चालवणारे नंदुरबार मध्ये कार्यरत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. जिल्हा प्रशासन याची दखल घेईल का असा प्रश्न केला जात आहे.
    रुग्णांच्या जीवाशी खेळ करीत ऑक्सिजनचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून ज्यादा पैसे लुबाडणारे नंदुरबार शहरात कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन अशा नराधमांचा बंदोबस्त करणे आवश्यक बनले आहे. एकीकडे केंद्र सरकारने मोफत वाटप करण्यासाठी दिलेल्या रेमडेसीवर इंजेक्शनचा घोटाळा उघडकीस आलेला आहे. ते रॅकेट्स चालवणाऱ्या घोटाळे बहाद्दरांच्या अद्याप मुसक्या बांधण्यात आलेल्या नाहीत. असे असतानाच नंदुरबार जिल्ह्यात ऑक्सिजनचा देखील घोटाळा केला जात असल्याचे सुदर्शन न्युज च्या टीमला निदर्शनास आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 4000 किंमतीचे सिलेंडर काळ्या बाजारात 12000 ला विकले जात आहे. कोविड रुग्णाचा जीव वाचावा म्हणून धडपड करणाऱ्या नातलगांना नाडले जात आहे. नंदुरबारमधील एक व्यापारी प्रत्यक्षात 1 गाडी सिलेंडर मागवतो. मात्र रेकॉर्डवर 10 ते 20 सिलेंडरचे बिल घेऊन काळा बाजार वाढवत आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळणारा हा मस्तीखोर राजकीय आणि प्रशासकीय आशीर्वादाने काळाबाजार चालवत आहे का? असे बोलले जाते. वास्तविक देशात सध्या 50,000 मेट्रिक टन साठा उपलब्ध असल्याचे केंद्र कडून माहिती देण्यात आली आहे. देशात प्रत्येक दिवशी मात्र 3000 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. म्हणजेच देशात आणि कोणत्याही राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. तथापि महाराष्ट्र आणि नंदुरबार मध्ये कोणत्याही प्रकारची किल्लत नसताना बोगस तुटवडा निर्माण करून ऑक्सिजनची मागणी वाढवण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी काळाबाजार करणाऱ्या व्यापाराच्या ताबडतोब मुसक्या बांधाव्या, अशी रुग्णांच्या नातलगांकडून मागणी होऊ लागली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार