सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अडवाणींच्या नावे खोटे ट्विट करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करणार

माजी उपपंतप्रधान व भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाने बनावट ट्विट करणाऱ्या संबंधितांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार आहे,

Sudarshan MH
  • Apr 29 2021 1:42PM
 
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची माहिती 

माजी उपपंतप्रधान व भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाने बनावट ट्विट करणाऱ्या संबंधितांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यानिमित्ताने भाजपा विरोधकांच्या वैफल्याचे दर्शन झाले आहे, असेही उपाध्ये यांनी म्हटले आहे. 

उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की, ज्येष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाने बुधवारी एक ट्विट प्रसिद्ध झाले होते. मात्र ज्या ‘@LK_Adwani’ हॅन्डल वरून हे ट्विट करण्यात आले आहे, ते हॅन्डल मा. अडवाणी यांचे नाही, असे प्रसारमाध्यमांना आढळून आले. त्याच बरोबर मा. अडवाणी यांचे ट्विटरवर अकाऊंटच नसल्याचा खुलासा मा. अडवाणी यांचे स्वीय सहाय्यक दीपक चोप्रा यांनी केला आहे.    

असे खोटे ट्विट करून सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्यांचे भांडे फुटले आहे. या ट्विट मागे असणाऱ्या मंडळींचा शोध घ्या व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी उपाध्ये यांनी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार