सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुसद शहरातील महावीर वार्डात घराला अचानक लागलेल्या आगीत घरमालकाचा मृत्यू

आत्महत्या असल्याची शेजाऱ्यां मध्ये चर्चा

Sudarshan MH
  • Feb 22 2021 6:32AM
 
 
*पुसद शहरातील महावीर वार्ड येथे एका घराला अचानक आग लागली. या आगीमध्ये घरमालक हा जळुन ठार झाला आहे सुदैवाने घरमालकाची पत्नी मात्र यात बचावली या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे*
 
परिसरातील राहणाऱ्या तरुणांनी तात्काळ येथील अग्निशामक दल बोलावुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. बाजुलाच संतोषकुमार अग्रवाल यांचे गोदाम व आजुबाजुला घरही आहे. आग विझविल्यामुळे इतरत्र आग पसरली नाही. प्राप्त माहितीनुसार, मृतक अरुण केशरचंद नरसिंग वय ६२ हे आपल्या पत्नीसोबत घरामध्ये राहत होते. ते आतील खोलीत झोपलेले होते आणि त्यांची पत्नी विद्या अरुण नरसिंग ही दुसऱ्या खोलीत मध्ये झोपलेले होते. अचानक पहाटे ४ च्या दरम्यान घराला आग लागली. विद्या नरसिंग यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावुन आले. परंतु ज्या खोलीला आग लागली त्या खोलीत असलेले अरुण केशरचंद नरसिंग हे आगीत सापडल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. घरा शेजारील रुपेश अग्रवाल, संदीप आहाळे, संतोष आहाळे, निखील नरसिंग, अनिकेत आहाळे, शैलेश आहाळे यांनी सतर्कता बाळगत प्रथम अग्निशामक दल बोलावले आणि आग विझविली. त्यानंतर ठाणेदार पांडुरंग फाडे हे आपल्या पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी प्रथम जळालेल्या अवस्थेत असलेले अरुण नरसिंग यांचे प्रेत बाहेर काढले. घराचा पंचनामा केला. त्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. शहर पो.स्टे. मध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे. मागील १५ दिवसांपासुन मृतक अरुण नरसिंग हे उपाशी होते. गेल्या अनेक दिवसापासून मानसिकतेने देखील ग्रासले होते अशी चर्चा शेजारी मध्ये आहे.त्यांना अपत्य नाही. घराला आग लागली की त्यांनी आत्महत्या करण्यासाठी पेटविले? या बाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.घराला आग प्रकरणी अधिक तपास शहर पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे.
 
*प्रतिनिधी किरण मुक्कावार पुसद जिल्हा यवतमाळ*

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार