सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मास्क न लावणाऱ्या 5 हजार 587 जणांकडून 11 लाखाचा दंड वसूल; शाळाही 31 मार्चपर्यंत बंद राहणार

नंदुरबार : मास्क न लावणाऱ्यांकडून 11 लाखाचा दंड वसूल

Nandurbar. MH
  • Mar 12 2021 9:36PM
नंदुरबार : मास्क न लावणाऱ्यांकडून 11 लाखाचा दंड वसूल करण्यात आला असून ही कारवाई अधिक कडक करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून नंदुरबार व शहादा शहर हद्दीतील सर्व शासकीय, निमशासकीय शाळा, निवासी शाळा, कॉलेज, वसतीगृहे, कोचिंग क्लासेस व प्रशिक्षण केंद्र 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.
       पोलिसांनी कडक धोरण अवलंबल्याने 5 हजार 587 जणांकडून हा दंड वसूल करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 11 फेब्रुवारीपासून 12 मार्च पर्यंतच्या कालावधीतील ही दंड वसूली आहे. तर 545 जणांवर कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय दंडविधान कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
       जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा शहरात नंदुरबार जिल्ह्याच्या एकूण रुग्णांचे 80 टक्के कोविड-19 रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे रुग्णवाढीचा आलेख दर दिवसाला उंचावत असल्याने रुग्ण संख्येवर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच या दोन्ही शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यगृहे यांच्यामार्फत जास्तीत जास्त घरपोच पार्सल सुविधा पुरविण्यास प्राधान्य देण्यात यावे. घरपोच सुविधांचे किचन वितरण कक्ष सायकांळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. नंदुरबार व शहादा शहर हद्दीतील आठवडे बाजार बंद राहतील.
 
कोणत्याही व्यक्ती, समुह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार