सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबई हायकोर्टाचा निर्णय येताच काही तासातच गृहमंत्री आनिल देशमुखानी दिला गृहमंत्री पदाचा राजीनामा

आनिल देशमुखानी दिला गृहमंत्री पदाचा राजीनामा

Sudarshan MH
  • Apr 5 2021 3:40PM
 
प्रतिनिधि:- दिपक चव्हाण
मुंबई चे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री आनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावर आज मुंबई हायकोर्टा द्वारे सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आसुन मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही तासातच आपला गृह मंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. गृहमंत्री आनिल देशमुख यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र ट्विटर वर नुकतेच काही मिनिटं पूर्वी नुकताच पोस्ट देखील केलं आहे. आजच हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप परबमीर सिंग यांनी केले होते त्यासंदर्भात सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 
 
 
मुंबई हायकोर्टानं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय आज सकाळीच दिला होता त्यानंतर अगदी काही तासातच महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलाढाल दिसून आले आहे.....
 
आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याची बातमी माध्यमात काही वेळा पूर्वी आलेली होती .देशमुख यांनी पवार यांच्याकडे आणि राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली केली होती .ती शरद पवार यांनी मान्य केली असल्याची सूत्रांची माहिती त्यानंतर अनिल देशमुख यांनी त्यांच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे....

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार