सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कर्तव्य जपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीने बोईसर मध्ये हळहळ.

एका कर्तव्य निष्ठ आधिकाऱ्याला पोलिस कर्मचाऱ्याच्या चुकिने पदभार सोडावा लागला.

Sudarshan MH
  • May 28 2021 11:07AM


एका कर्तव्य निष्ठ आधिकाऱ्याला पोलिस कर्मचाऱ्याच्या चुकिने पदभार सोडावा लागला.

एक उत्कृष्ट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्दित  समाजसेवकाचे दर्शन घडवणारा  व टाळेबंदीच्या काळात हजारो कामगारांचा अन्नदाता म्हणून पोलीस वर्दीत प्रसिद्ध झालेले वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रदीप कसबे.

पलघर -  देशात कोरोना महामारीचे संकट गडद झाल्यानंतर भारतासह जगाच्या अनेक देशामध्ये टाळेबंदी सुरू करण्यात आले. त्याच धर्तीवर भारतात ही टाळेबंदी सुरू करण्यात आली. या काळात आशिया खंडातील सर्वात मोठी बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतमधील कारखाने बंद झाल्याने सुमारे राज्यातील व परराज्यातील हजारो कामगाराचे उपजीविकेचे साधन बंद झाल्याने त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आल्याने हजारो कामगार स्थलांतराच्या मार्गावर होते. स्थानिक महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनासमोर याचे मोठे आव्हान होते. अशातच बोईसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी धाव घेत हजारो कामगारांचे अन्नदाता बनले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी बोईसर पोलीस स्टेशन चा पदभार दोन वर्षा पूर्वी स्वीकारल्या नंतर बोईसर औद्योगिक शहरातील काम करणाऱ्या कामगारांचा मोर्चा अथवा एक ही आंदोलन बोईसर पोलीस स्टेशनमध्ये झाले नाही याचे मुख्य कारण म्हणजे कंपनी प्रशासन व कंपनी कामगार यांच्यामध्ये योग्य समन्वय निर्माण करून कामगाराना योग्य न्याय मिळून दिलेला आसल्याने कामगार वर्ग ही प्रदीप कसबे यांच्या बदल आदर वेक्त करत आहेत.

बोईसर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात विविध समाजाचे लोक राहतात परंतु आजपर्यंत कधीही या दोन वर्षांमध्ये बोईसर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कधीही जातीय वादाच्या घटना घडल्या नाहीत.

 लॉकडाऊन काळात बोईसर पोलीस स्टेशनच्या जवळपास वरिष्ठ अधिकार्‍यांसह नव्वद कर्मचार्‍यांच्या जीवांची काळजी घेत त्यांचे मनोधैर्य वाढवून नागरिकास जास्तीत जास्त सहकार्य करण्यास प्रदीप कसबे उत्साहित करत होते.

 राज्यात दुसऱ्यांदा लॉक डाऊन सुरु झाल्या नंतर बोईसर शहरांमध्ये मोठ्या संख्येने कोरोणा रुग्णांची संख्या वाढत असल्याचे स्थानिक आरोग्य जिल्हा आरोग्य यंत्रणा हतबल झाली होती अशावेळी बोईसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी  पुढाकार घेऊन कोरोना रुग्णांना तात्काळ बेडची उपलब्धता करून देणे त्यांना औषधोपचाराची उपलब्धता करून देणे मोफत रुग्नवाहिक़ा मिळून देणे अशा विविध आरोग्य सेवा पोलिस अधिकारी कसबे त्याच्याकडून कोरोणा रुग्णांच्या नातेवाईकांना व रुग्णांना पुरवल्या जात असल्याने बोईसर शहरातील नागरिकान कडून प्रदीप कसबे यांचे आभार प्रकट करण्यात येत होते.

गेल्या काही दिवसा पूर्वी पोलिस  स्टेशन चा उपनिरीक्षक धूमाळ हा लाच लुचापत विभागाच्या जाळ्यात अडकल्या नंतर प्रदीप कसबे यांचा या प्रकरणासी काड़ी मात्र सम्बंध नसताना त्यांची पोलीस मुख्यालय येथे तात्काळ बदली करण्यात आल्याने वरिष्ठ पोलिस आधिकाऱ्या बदल नागरिकांनी नाराजगी वेक्त करण्यात येत आहे.

 तसेच प्रदीप कसबे यांना परत बोईसर पोलीस स्टेशन च्या प्रभारी पदी नियुक्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत परंतु कसबे यांनी बोईसर पोलीस स्टेशनचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्याने माझी दूसरी ठिकाणी बदली झाल्याचे काही नागरिकांना सांगितले आहे.

कोट -

कसबे साहेबांनी बोईसर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्या नंतर एवढ्या मोठ्या उद्योज नगरित कायदा सुव्यवस्था आबादित ठेऊन बोईसर मध्ये सर्व जातीधर्मातील नागरिकांना एकत्र करून जातीय स्लोखा निर्माणा केल्याने बोईसर मध्ये कधी ही जाती वाद घड़ले नाहीत कायदा सुव्यवस्था सुरळीत राहिले आहे कोरोणा काळात कामगारांना व सामान्य नागरिकांनाही आमच्यासह इतर सामाजिक संघटनांच्या मदतीने मोठी मदत केली होती.

नीलम संखे
बोईसर शिवसेना विधानसभा प्रमुख संघटक

कोट - 
  साहेबांच्या कड़े बोईसर पोलिस स्टेशन चा पदभार असताना सर्व राजकीय नेत्यांना योग्य मार्गदर्शन करून सर्व सामान्या नागरिकांना ही न्याय देण्याचा पर्यंत केला आहे त्यांच्या कार्यकाळा मध्ये एकाद घटना घडली की तात्काळ ती घटना उगड़किस येत आसल्याने कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली होती तसेच कोरोणा काळात आमच्या सह इतर सामाजिक संघटनान घेऊन त्यांनी चांगल्या प्रकारी कामगार व सामान्य नागरिकांना मदत केली होती.

भावेश चुरी
मनसे पालघर उपजिल्ह अध्यक्ष

कोट -
एवढ्या मोठ्या बोईसर शहरां मध्ये कायदा-सुव्यवस्था सुंदर राबवली जात होती कोरोणा काळा मध्ये औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना आमच्या सह इतर सामाजिक संघटनाना एकत्र घेऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात अन्नदान करून कामगारांना व सामान्य नागरिकांना इतर ही विविध पुरवल्या होत्या चांगल्या स्वभावाचे साहेब आसल्याने सर्व राजकीय व सर्वसामान्य नागरिकांच्या एकदम जवळचे अधिकारी म्हणून परिचित होते.

अशोक वडे 
पालघर जिल्हा उपाध्यक्ष बीजेपी

कोट -
कारखान्यांमध्ये काही कायदा सुव्यवस्थे बाबत च्या समस्या निर्माण होत होत्या त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रदीप कसबे साहेब आम्हाला नेहमी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत होते कसबे साहेबांचे कारखानदारांना नेहमी सहकार्य लाभले आहे त्यांची बदली झाल्याने आम्हाला दुःख होत आहे.

दिनेश शर्मा
 कारखाना मालक बोईसर

कोट - 
बोईसर शहरामध्ये कधीही जातीयवाद साहेबांच्या कार्यकाळात निर्माण झाले नाहीत आमची ईद असेल किंवा इतर तेव्हार असतील किंवा हिंदू धर्माचे   नवरात्र,गणपती, किव्हा मिरवनुका असतील हे सर्व साहेबाच्या सहकार्याने गुण्यागोविंदाने पार पडल्या आहेत

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार