*संभाजीनगर*
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी कायम समाजकारणाला प्रथम महत्त्व दिले त्यांची शिकवण आणि विचार प्रत्येक हिंदु नागरिकांच्या आणि शिवसैनिकांच्या मनामनात रुजलेले आहे आज बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना संभाजीनगर शाखेच्यावतीने क्रांतिचौक या ठिकाणी *शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार आमदार अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली दृष्टीहीन व अपंगांना आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते* अन्न धान्याचे वाटप करण्यात आले एकूण ७२ अपंगांना धान्य देण्यात आले. त्याचप्रमाणे जनोद्दीन शेख या अपंग मुलाला तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे रमेश बहुले सतीश कटकटे महिला आघाडी जिल्हा संघटक सुनिता देव उपजिल्हासंघटक प्रतिभा जगताप अंजली मांडवकर शहर संघटक प्राजक्ता राजपूत अपंगांसाठी काम करणाऱ्या समाजसेविका शिल्पा चुडीवाल ज्योती भंडारी गतिमान अपंग संघटनेचे अध्यक्ष गणेश सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
*यावेळी बोलताना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी सांगितले की राजकारण करत असताना आपण समाजकारणाला प्राधान्य दिले पाहिजे संभाजीनगरतील प्रत्येक शिवसैनिक बाळासाहेबांच्या शिकवणीत घडलेला असून त्यांच्या शिकवणीचे पालन करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत आहे याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी अपंगांना धान्य व तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले आयोजकांनी अतिशय चांगला उपक्रम याठिकाणी घेतला म्हणून मी त्यांचे कौतुकही करतो व अशाच प्रकारे यापुढेही समाजातील गोरगरीबांची सेवा करत रहावी असे आवाहन करतो.* याप्रसंगी विभागप्रमुख प्रकाश कमलानी अभिजीत पगारे रणजीत ढेपे नंदू लबडे प्राध्यापक संतोष बोर्डे युवासेनेचे धर्मराज दानवे रणजीत दाभाडे अनिल बिरारे संतोष जाटवे रवी लोढा संजय लोहिया बंटी जैस्वाल कैलास राठोड सुशील विजयसेनानी अनुश डोंगरे रोहित चंद्रटिके आकाश दानवे अभय आव्हाड अल्केश जाधव यशोदीप चौधरी अक्षय नरवडे विजय भांडारकर देविदास खरात राजेश बनकर शिवा आहेर आकाश इंगळे सचिन सुलताने विशाल राऊत प्रदीप जाधव रामेश्वर पेंढारे संदीप तरटे वैभव जाधव महिला आघाडीच्या स्मिता जोशी सुनीला क्षत्रिय सुषमा यादगिरे अरुणा भाटी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
*अभिजीत पगारे*
प्रसिद्धीप्रमुख शिवसेना
*संभाजीनगर पश्चिम शहराच्या च्या वतीने स्मृतीदिनानिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन*
शिवसेना पश्चिम शहराच्या वतीने कोकणवाडी चौक या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे,आमदार संजयजी शिरसाट, मा.महापौर नंदकुमार घोडेले,शहरप्रमुख विजय वाघचौरे मा.नगरसेवक गजाजन बारवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपशहरप्रमुख संजय बारवाल, राजु राजपूत,रमेश बाहुले ,विभागप्रमुख प्रकाश कमलानी,अभिजीत पगारे ,भरत बरथुने,उपविभागप्रमुख संतोष जाटवे,बंटी सोनवणे,संजय सकुंडे,संतोष बारवाल,दिपक मात्रेकर, अनिल बिरारे,कैलास राठोड,चंद्रकांत लिंगायत,रमेश रोडगे, योगेश ठाकूर,चंद्रकांत शहाणे,गजाजन हाके,गणेश रोडगे,प्रमोद सकुंडे,सागर बारवाल,लक्ष्मण जोशी,शंकर सकुंडे,संजय राऊत,अरुण नरवडे,ओम पांचाळ व सर्व शिवसैनिक उपस्थित होते