सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापूर शहरालगत बेडकी नाका परिसरात हॉटेल उर्वशी लगतच्या मोकळ्या जागेत अवैधरित्या बायोडिझेल विक्री

आज रोजी पुरवठा विभागामार्फत कारवाई करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान दोन पत्राच्या शेड आढळून आले असून पैकी एकामध्ये दोन रिडींग युनिट संच व दुसऱ्या शेडमध्ये तीन प्लास्टिकच्या टाक्या, एच. पी. मोटर. लोखंडी टाकी व पाईप आढळून आला.

Nandurbar MH
  • Sep 6 2021 7:30PM
नवापूर शहरालगत बेडकी नाका परिसरात हॉटेल उर्वशी लगतच्या मोकळ्या जागेत अवैधरित्या बायोडिझेल विक्री होत असल्याच्या तक्रारी या कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आज रोजी पुरवठा विभागामार्फत कारवाई करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान दोन पत्राच्या शेड आढळून आले असून पैकी एकामध्ये दोन रिडींग युनिट संच व दुसऱ्या शेडमध्ये तीन प्लास्टिकच्या टाक्या, एच. पी. मोटर. लोखंडी टाकी व पाईप आढळून आला. तसेच टाक्यांमध्ये अंदाजे 9 हजार लीटर इतके एस.एन. 70 व्हाईट ऑईल आढळून आले आहे. सदर दोन्ही शेड पंचनामा करुन सीलबंद करण्यात आले आहेत. स्थानिक माहितीनुसार सदर व्यवसाय फिरोज लाखाभाई आगाम हे करत होते. प्रस्तुत कारवाईत व्हाईट ऑईलचे नमुने घेण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

सदर कारवाईत पुरवठा विभागाचे मिलिंद निकम, दिलीप पाडवी, अक्षय लोहारकर हे कर्मचारी सहभागी होते. तसेच पोलीस विभागामार्फत पोलीस उपनिरिक्षक पठाण हजर होते.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार