सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विसरवाडीत घरफोडी करणारे चोरटे जेरबंद

विसरवाडी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुरनं. ४१४/२०२१ भादंवि ४५७, ४६१,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Nandurbar MH
  • Sep 26 2021 7:01PM

दि. २६/०९/२०२१ रोजी विसरवाडी येथील व्यापारी रविंद्र किसनलाल अग्रवाल यांचे मालकींचे कुंभार गल्लीतील बालाजी हार्डवेअर दुकानाचे बाजुला असलेल्या किराणा सामान ठेवायच्या गोडावुन मधुन कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी दि. २५/०९/२०२१ चे रात्री ०८-०० दि. २६/०९/२०२१ चे सकाळी ०८-३० वाजेच्या दरम्यान फिर्यादीच्या संमतीशिवाय गोडावुनचे मागील दरवाजा तोडुन अत घुसुन एकुण ३६,१००/- रुपयाचा किराणा माल व झर वस्तु चोरुन नेल्या. त्याबाबत फिर्यादी यांनी विसरवाडी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुरनं. ४१४/२०२१ भादंवि ४५७, ४६१,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा API/ नितीन पाटील, PSI/ भुषण बैसाणे तसेच पोलीस स्टेशन अंमलदार हे त्यांचे पथकातील अधिकारी कर्मचारी यांचे मदतीने तपास करीत असतांना API/ नितीन पाटील यांना गुप्त बातमीदारांमार्फतीने बातमी मिळाली की, सदरच्या गुन्ह्याबाबत विसरवाडी गावातील कुंभारगल्ली व नवीदिल्ली भागातील सराईत गुन्हेगारांनी गुन्हा केल्याबाबत माहीती मिळाल्याने पथकातील PSI / भुषण दिलीप गावित, NPC/राजु कोकणी, PC/ विपुल नाईक, PC/विश्वनाथ नाईक, बैसाणे, ASI/ PC / विशाल गावित अशांनी मिळुन कुंभार गल्ली व नवी दिल्ली विसरवाडी येथे जावुन आरोपी १) सागर रामदास जगदाळे, वय-२५ वर्षे, रा. कुंभार गल्ली, विसरवाडी २) गुरुदास झाल्या भिल, वय २५ वर्षे, ३) राकेश सुरेश साळुंखे, वय-२४ दोन्ही रा. नवीदिल्ली, विसरवाडी यांना मोच्या शिताफिने ताब्यात घेवून सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा आम्हीच केला असल्याची कबुली दिली आहे. आरोपीतांना मुद्देमालासह विसरवाडी पोलीसांनी ताब्यात घेतले असुन तपास चालु आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, मा. अपर पोलीस अधिक्षक पवार सो., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार सचिन हिरे सो. यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी API/ नितीन पाटील, PSI/ भुषण बैसाणे व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार