सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबई तिसऱ्या टप्प्यात घोषित..महापालिकेकडून नियमावली जाहीर..

सध्याच्या आकडेवारीनुसार मुंबई तिसऱ्या गटामध्ये आहे.

Sudarshan MH
  • Jun 6 2021 10:04AM


सध्याच्या आकडेवारीनुसार मुंबई तिसऱ्या गटामध्ये आहे. ब्रेक द चेन मिशन अंतर्गत करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंधांसंबंधी आज मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

या परिपत्रकात सांगण्यात आले आहे की, ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने ४ जून अन्वये आदेश पारित केलेले आहेत. या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत कोविड-१९ पॉझिटिव्हिटी रेट ५.५६ टक्के असुन, ऑक्सिजन बेड व्याप्तीचा दर ३२.५१ टक्के आहे. त्या अनुषंगाने बृहन्मुंबई महागरपालिका हद्दीत पुढील प्रमाणे आदेश लागू राहातील.

राज्य शासनाच्या आदेशातील निकषांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत लेवल ३ चे सर्व निर्बंध जसेच्या तसे लागू राहातील. तसेच, महापालिकेने ब्रेक द चेन मिशन अंतर्गत यापुर्वी जारी केलले सर्व आदेश रद्द ठरतील. शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सर्व व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर व इतर उपाययोजना अनिवार्य राहातील. आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास किंवा विरोध दर्शवल्यास संबिधताविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. हे आदेश सोमवार ७ जून पासून लागू असणार आहेत.
 
जाणून घ्या काय आहेत नवे नियम? –  
अत्यावश्यक सेवेतील दुकाने दररोज सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहातील. तसेच, इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहातील व शनिवार आणि रविवारी बंद राहातील. मॉल्स व सिनेमागृह बंद राहातील. हॉटेल्स सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहातील. त्यानंतर पार्सल आणि होम डिलिवरी सेवा सुरू राहील. लोकल सेवा ही सर्वसामान्यांसाठी बंद राहणार असून, केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच सुरू असणार आहे. सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी ५ ते ९ यावेळेत सुरू राहातील. खासगी कार्यालयांना ५० टक्के उपस्थितीसह कामकाजाच्या दिवसात सायंकाळी ४ वाजपेर्यंत परवानगी दिली गेली आहे. बाहेर खेळण्याठी पहाटे ५ ते ९ व सायंकाळी ६ ते ९ या कालावधीत परवानगी दिली गेली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमसाठी एकत्र जमण्यास ५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. तसेच, विवाह सोहळ्यास ५० जणांची, अंत्यसंस्कारासाठी २० जण व अन्य बैठकांसाठी ५० टक्के उपस्थितीस परवानगी दिली गेली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार