सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अवैध राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने चौघांना चिरडले

लग्न सोहळा उरकून परतणाऱ्या युवकांवर काळाचा घाला

Abhimanyu
  • Dec 13 2020 10:31PM

गंगाखेड : अवैध राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्पर आणि प्रवाशी ऑटो च्या भीषण धडकेत चार जण जागीच ठार झाल्याची घटना करम पाटी  येथे घडली आहे.
 परळी- गंगाखेड रोडवरील सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करम पाटी जवळ रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही  घटना घडलीय.
 विनापरवाना राखेची वाहतुक करणारे टिप्पर परळी - गंगाखेड मार्गावर भरधाव वेगात टिप्पर चालत असल्याने  या महामार्गावर सातत्याने अपघात होत असतात. आज दि 13 डिसेंबर रोजी  परळीहून गंगाखेडला निघालेल्या भरघाव टिप्परने  सोनपेठ तालुक्यातील चुकार पिंप्री येथून लग्न समारंभ आटोपून अंबाजोगाई कडे येणाऱ्या प्रवासी ॲटोला   करम पाटी येथे जोराची धडक दिली. या धडकेत ॲटोमधील विशाल बागवाले ( वय 20),दत्ता भागवत सोळंके (वय 25) ,आकाश चौधरी ( वय 23) आणि ॲटो चालक मुकुंद मस्के (वय 22) सर्व राहणार अंबाजोगाई हे चार जण जागीच ठार झाले. या अपघातात मृत झालेल्या चौघांचे मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार