सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अल्पवयीन मुलीचं लग्न लावल्याप्रकरणी आई वडिलांसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

आज रोजी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील सारोळा येथे 15 वर्षाच्या मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी मुला-मुलींचे आई-वडिल, लग्न लावणारा ब्राह्मण यांच्यासह आठजणांविरुध्द औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

N.B.Mohanale
  • Apr 15 2021 5:32PM
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील सारोळा येथे 15 वर्षाच्या मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी मुला-मुलींचे आई-वडिल, लग्न लावणारा ब्राह्मण यांच्यासह आठजणांविरुध्द औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात ग्रामसेवक धनंजय हरिश्चंद्र शहापुरे यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, औसा पोलीस ठाण्यात त्यांना एक पत्र प्राप्त झाले. त्यामध्ये सारोळा येथे बालविवाह झाल्याची माहिती होती. त्याबाबत खात्री करून कायदेशीर कार्यवाही करावी, असे नमुद करण्यात आलेले होते. सारोळा येथे सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्यासह ग्रामसेवकांनी किशन हणमंत शिंदे यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता 15 वर्षाच्या मुलीचे लग्न किशन हणमंत शिंदे रा. सारोळा याच्यासोबत 17 मे 2020 रोजी लावल्याचे चौकशीत निदर्शनास आले. लग्नविधी करणाऱ्या ब्राह्मणाचे नाव, गाव समजले नाही. लग्न लावण्यासाठी मुलीच्या वडिलांनी ब्राह्मण आणलेला होता. या प्रकरणी हणमंत दुर्गाप्पा शिंदे, शांताबाई हणमंत शिंदे, दत्ता दंडगुले, शिवकांता दंडगुले, येलप्पा बंडगर, गुरूबाई शिवराम चव्हाण, किसन हणमंत शिंदे व लग्नविधी करणारा अनोळखी ब्राह्मण अशा आठजणांविरुध्द बालविवाह लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार