अभाविप तर्फे स्व.स्वप्निल लोणकरला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व महाराष्ट्र शासनाच्या कुचकामी धोरणांचा निषेध करण्यात आला.
अभाविप तर्फे स्व.स्वप्निल लोणकरला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व महाराष्ट्र शासनाच्या कुचकामी धोरणांचा निषेध करण्यात आला.
अभाविप तर्फे स्व.स्वप्निल लोणकरला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व महाराष्ट्र शासनाच्या कुचकामी धोरणांचा निषेध करण्यात आला.
(योगेश शर्मा)
बुलडाणा : MPSC परिक्षा उत्तीर्ण होऊन सुद्धा मुलाखत न झाल्याच्या नैराश्यातुन कष्टकरी शेतकरी कुटुंबातील गुणवंत विद्यार्थी स्व.स्वप्निल लोणकरने आत्महत्या केली. राज्य शासनाच्या कचखाऊ धोरणामुळेच आज तरूणांना स्वतःचे आयुष्य संपवावे लागत आहे. हे अत्यंत निंदनीय व खेद जनक आहे. स्वप्निल हा महाराष्ट्र शासनाचा नाकर्तेपणा मुळे घेतलेला बळी आहे.
या विषयाला अनुसरून आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चिखली शाखे तर्फे स्व. स्वप्निल लोणकर या MPSC मुख्य परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांला कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पित केली तसेच MPSC विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ राज्य शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आले. यावेळी सागर पुरोहित, मयुर गिते, चैतन्य जोशी,राहुल नागपुरे ,मकरंद जोशी, कैवल्य कुलकर्णी, तेजस भवर,शंकर उद्रकर,सुरज थोरवे, अदि कुलकर्णी, प्रथमेश देशपांडे, दर्शन ठाकूर, योगेश मिसाळ, यश मंडोरा आदि. कार्यकर्ते उपस्थित होते.
*मयुर गिते* :- स्वप्निल लोणकर याने केलेली आत्महत्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाच उदाहरण आहे. महाराष्ट्र शासनाने एमपीएससी च्या प्रलंबित परिक्षा व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीवर रूजू करण्याची करून घ्यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प