सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

यावर्षी "वारी" फक्त... *"मनमंदिर वारी"...!*

एवढं सगळं रामायण महाभारत होत असलं तरी यावेळची "एकादशी" अठ्ठावीस युगातील एक वेगळीच "एकादशी" असणार आहे...! कुणाला येऊ दिलं नाही... कुणी आलं नाही तरी आपण आपल्या घरी राहून वेगळ्या पद्धतीने "वारी" साजरी करावी अशी एक कल्पना पंढरपूरचा तरुण मंदार मार्तंड केसकर यांनी मांडली आहे.

Snehal Joshi
  • Jun 29 2020 8:50PM
 *"आषाढ शुद्ध एकादशी बुधवार दि. 1-7-2020 रोजी सकाळी 9 वाजता फक्त 5 मिनिटे".....* "वारी" या विषयावरून सगळीकडे नुसता हलकल्लोळ सुरू आहे. काय करावं..? काय होणार..? याची चिंता ज्याच्या त्याच्या तोंडी... पोस्टवर... स्टेटसला... आहे ! एवढं सगळं रामायण महाभारत होत असलं तरी यावेळची "एकादशी" अठ्ठावीस युगातील एक वेगळीच "एकादशी" असणार आहे...! कुणाला येऊ दिलं नाही... कुणी आलं नाही तरी आपण आपल्या घरी राहून वेगळ्या पद्धतीने "वारी" साजरी करावी अशी एक कल्पना पंढरपूरचा तरुण मंदार मार्तंड केसकर यांनी मांडली आहे. हे आवाहन एक "विश्वरूपदर्शनाचा" सोहळा होईल एवढं मात्र नक्की...! या lockdown च्या सुरुवातीपासून आपल्याला जसे संदेश , सूचना मिळाल्या आपण सगळ्यांनीच त्या समाज हिताय म्हणून पाळल्या. पण कोरोनाच्या भितीमुळे सर्वांनी "विश्वबंधुत्व" सांभाळलं हे मात्र मान्य करावं लागेल. हीच आपण सर्वांनी खांद्यावर घेतलेली "विश्वबंधुत्वाची" पताका या वारीसाठी पुन्हा एकदा खांद्यावर घेऊया..! कारण "पंढरीची वारी"... हे एक वेगळंच प्रस्थ आहे..! आपणास मंदार केसकर यांची "पंढरपूरकर" म्हणून विनंती आहे. की तमाम भक्तभाविकांनी .... *"आषाढ शुद्ध एकादशी बुधवार दि. 1-7-2020 रोजी सकाळी 9 वाजता फक्त 5 मिनिटे".....* आपल्या घराबाहेर न पडता घरातच राहून... इतर गावातील लोकांनी आपल्या घरी... आपल्या कामाच्या ठिकाणावर राहून... त्या वेळेला जिथं असाल तिथं... फक्त 5 मिनिटे वेळ काढून.... *"बोला पुंडलिका वरदे ...* *हरी विठ्ठल....* *श्री ज्ञानदेव तुकाराम...* *पंढरीनाथ महाराज की... जय..."* *"विठ्ठल... विठ्ठल.... विठ्ठल... विठ्ठल... विठ्ठल.... विठ्ठल... विठ्ठल..."* हा जयघोष... मोठ्या आवाजात सलग करावा ..." जेणेकरू गावागावात... खेड्यापाड्यात.... घराघरात.... "श्री विठ्ठल रखुमाई" च्या जयघोषाने... सगळा आसमंत दुमदुमून जाईल... अन .. "देव मस्तकी धरावा.. अवघा हलकल्लोळ करावा..." या संतवचनाची अनुभूती येईल...! अनेक भाविका भक्तांनी त्यांना या संकल्पनेसाठी उत्तम असा प्रतिसाद दिला आहे. तरी शेवटी काय आपल्या मनातील मंदिराचे गाभारे आजपर्यंत तरी कुणी "बंद" केले नाहीत ना.. ? मग झालं तर... आपापल्या घरात... गावात.. परिसरात ... वरील जयघोषात ... *"मनमंदिर वारी"* करून... "पंढरीचे सुख" अनुभवावे... आपले गाव... आपला परिसर... आपले घर... अवघे "पंढरपूर".... करावे...! कोरोना च्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात वारकऱ्यांना येण्यास मज्जाव आहे. त्यात कडक असे लॉक डॉऊन किंवा कर्फ्यू मय वातावरण पंढरपूराचे झाले आहे. त्यामुळे भाविकांना पांडुरंग रुक्मिणी देवीचे लाईव्ह दर्शनाची सोय केली असली तरी, सामूहिक जय घोषा शिवाय वारी कदापि शक्य नाही. म्हणून मन मंदिरात ची वारी.. स्वतःच्या परी.. स्वतःच्याच घरी...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार