सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अ. भा.ब्रा. महासंघतर्फे गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार

गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार

Sudarshan MH
  • Jan 18 2021 10:28AM
(योगेश शर्मा)
बुलढाणा : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ मलकापूर तर्फे दिनांक १६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ब्राह्मण समाज सभागृह, मलकापूर येथे गुणवंत तथा यश संपादित विद्यार्थ्याचा सत्कार पंडित जगदीश प्रसाद शर्मा, इंदौर यांच्या हस्ते करण्यात आले.
विविध अभ्यासक्रमात तथा क्षेत्रात भविष्यात निश्चित यश संपादन करणे करीता विद्यार्थ्याना योग्य वेळी प्रोत्साहन मिळणे आवश्यक असते. अश्या उदात्त हेतूने अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ तर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार १६ जानेवारीला ब्राह्मण समाज सभागृह, मलकापूर येथे करण्यात आला. या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून इंदोर येथील प्रसिद्ध रामायण, भागवत, तथा परशुराम कथाकार तसेच ज्योतिष शास्त्रात प्राविण्य प्राप्त पंडित जगदीश प्रसाद शर्मा हे लाभले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक व्यास, ता.अध्यक्ष विशाल दवे, नरेश देशपांडे, ईश्वर दिक्षित, संदीप सावजी,मोहन मूळे सह आदी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

दरम्यान पंडित जगदीश प्रसाद यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना म्हटले की, आजच्या स्पर्धात्मक युगात  विद्यार्थी तत्पर असणे आवश्यक असते. या दशेत यश संपादित विद्यार्थ्याना भविष्यातील ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहन आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चिती करीत कठीण परिश्रम घेत प्रगती करावी असे प्रदीपदान केले.
या वेळी हरिओम देशपांडे,पावन सावजी, अथर्व सदावर्ते, उत्कर्ष सदावर्ते या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार