सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धबधब्यात पडून एबीव्हीपीचे राष्ट्रीय मंत्री ओव्हाळ यांचा मृत्यू! धडगाव तालुक्यातील बिलगावची धक्कादायक घटना

धडगाव तालुक्यातील बिलगावची धक्कादायक घटना

Nandurbar MH
  • Nov 11 2020 7:17PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री अनिकेत ओव्हाळ हे बिलगाव येथील धबधब्यात बुडून मरण पावल्याची अत्यंत धक्कादायक  व दुःखद अशी घटना घडली. आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी हा अपघात घडला. यामुळे ए बी व्ही पी संघटना वर्तुळात व भाजपा  कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली.

काल दि.10 नोव्हेंबर रोजी नंदुरबार बस स्थानकावर राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचे नंदुरबार येथील पदाधिकाऱ्यांकडून असे उत्साहात स्वागत झाले आणि आज ज्यांचे स्वागत केले त्याच ओव्हाळ यांचा मृतदेह नेण्याचा दुःखद प्रसंग या कार्यकर्त्यांवर आला.
अनिकेत गौतम ओव्हाळ हे मुंबई येथून आज दिनांंक 11 नोव्हेंबर 2020 रोजी काही कार्यक्रमानिमित्त नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. ओव्हाळ यांच्यासमवेत चार-पाच तरुण पदाधिकारी मित्र देखील होते. सातपुडा भागात नर्मदा नदीच्या काठावर अतिदुर्गम भागात धडगाव तालुक्यातील बिलगाव येथे एक मोठा धबधबा आहे. अनेक पर्यटक तिकडे भेट देतात. त्याप्रमाणे हे देखील धबधब्यावर गेले. त्याप्रसंगी अनावधानाने पाय सटकून ते खोल पाण्यात कोसळले. त्यांना वाचवायला लगेच  इतर दोन्ही मित्र उतरले. परंतु उतरलेल्या दुसऱ्या मित्राचा सुद्धा जीव धोक्यात आला. यादरम्यान अनिकेत हे पाण्याच्या खोल भोवऱ्यात ओढले जाऊन मरण पावले; अशी प्राथमिक माहिती कळाली आहे. त्यांचे अन्य मित्र  सुखरूप असल्याचे  सांगण्यात आले. दुर्गम भागात घटना घडली असल्यामुळे या घटनेची माहिती नंदुरबारच्या पदाधिकाऱ्यांना उशिरा कळाली. त्यांचे शव ताब्यात घेऊन मुंबईला पाठवण्याची व्यवस्था करण्यासाठी   एबीव्हीपीचे कायकर्ता नि पर्यंत केले . अनिकेत ओव्हाळ हे अत्यंत धडाडीचेेे कार्यकर्ते कार्यकर्ते होते. वयाची तिशी गाठण्या आधीच मात्र मृत्यूने त्यांना गाठल्यामुळे येथील सर्व कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त झाली. अनिकेत हे त्यांच्या मातापित्यांचे एकुलते एक पुत्र होते असे समजते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार