सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतात तुर काढतांना मळणी यंत्रात पदर अडकून 32 वर्षीय विवाहिता जागीच ठार

मळणी यंत्रात पदर अडकून 32 वर्षीय विवाहिता जागीच ठार

Sudarshan MH
  • Jan 18 2021 10:32AM
(योगेश शर्मा)
बुलढाणा : मलकापुर तालुक्यातील ग्राम तळणी येथे शेतात तुर काढतांना मळणी यंत्रात पदर अडकल्याने 32 वर्षीय विवाहिता जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी बारा वाजे दरम्यान घडली.
      याबाबत सविस्तर वृत्त असे की,ग्राम तळणी येथील सुनील ओंकार खराटे कुटुंबासह आपल्या शेतात तुर काढण्यासाठी सकाळी अकरा वाजता शेतात गेले मळणी यंत्र (थ्रेशर) सुरु करुन तुरीची पहिली पेंडी टाकताच पदर अडकल्याने सौ.भारती खराटे ह्या यंत्रात अडकल्याने पती सुनील,मुलगा प्रज्वल,मुलगी साक्षी यांनी आरडाओरड करताच उपस्थित ट्रॅक्टरचालक,मजुरांनी यंत्र बंद करून वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र यंत्रात अडकल्याने सौ.भारती चा जागीच मृत्यू झाला, घटनेची वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली,अपघाताची माहिती पोलीस पाटील गजानन नारखेडे यांनी बोराखेडी पो.स्टे.ला दिली पो.हे.काॅ प्रल्हाद वानखेडे,पो.काॅ ज्ञानेश्वर धामोडे आदींनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविला उपजिल्हा रुग्णालयात तळणी चे दिलीप नाफडे, अॅड राजेंद्र चोपडे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर, उपाध्यक्ष समाधान सुरवाडे  यांनी मदतकार्य केले शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात सायंकाळी अंत्यविधी उरकण्यात आला,या दुर्दैवी घटनेने परीसरात शोककळा पसरली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार