सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महापौरांचा 100% नालेसफाईचा दावा फोल; ही तर हातसफाई- आमदार ॲड.आशिष शेलार

दि.७.०६.२०२१ मुंबई शहरातील १०७ टक्के नाल्यांची सफाई झाल्याचा दावा महापौर यांनी केला होता.

Sudarshan MH
  • Jun 7 2021 4:58PM


भाजप च्या पहाणी दणक्यानंतर महापौरांना जाग - तातडिने नाला पहाणी दौरा आयोजित

दि.७.०६.२०२१
मुंबई शहरातील १०७ टक्के नाल्यांची सफाई झाल्याचा दावा महापौर यांनी केला होता. भाजपकडून सोमवारी शहरातील नाल्यांची पाहणी करून महापौरांचा १०७ टक्के नालेसफाई केल्याचा दावा फोल ठरवला. ही नालेसफाई नव्हे, तर हातसफाई केली आहे, अशी टीका आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केली. 

मुंबई शहरातील नालेसफाईचा आढावा घेण्यासाठी भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेता विनोद मिश्रा, स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट व भाजपा नगरसेवक यांनी शहरातील नालेसफाईचा पाहणी दौरा पूर्ण केला. यादरम्यान स्थानिक नागरिकांनीही नालेसफाईबाबत तक्रारी केल्या. नालेसफाईबाबत पालिका प्रशासन आणि शिवसेना मुंबईकरांच्या डोळ्यात धुळफेक करीत आहेत. नाल्यांमध्ये कचरा असल्याने पावसाळ्यात ते तुंबून त्याचा मुंबईकरांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईकरांची फसवणूक करणारे प्रशासन आणि शिवसेनेला सभागृहात उत्तर देऊ असा इशारा भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला.
इतके दिवस महापौर कार्यालयात बसून नालेसफाई १०७ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या महापौरांना भाजपाच्या नालेसफाई पाहणीनंतर जाग आली असून त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशीच तात्काळ नालेसफाईसाठी दौरा आखला असल्याची टीका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. त्याचबरोबर गजधरबंध, पीएनटी नाला, पोईसर नदी, जनकल्याण नगर नाला, वळनाई नाला, सोमैया नाला, जिजामाता नगर माहुल नाला हे सर्व नाले अद्याप गाळ, दगडमाती यांनी भरलेले आहेत. मुंबईच्या महापौर या नाल्यांचा दौरा करून १०७ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करतील काय? असा प्रश्नही गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला.

मुंबईकर नागरिकांच्या जीवाशी महापालिका खेळ खेळत असल्याची टीका आमदार श्री. शेलार यांनी केली. दरवर्षी नालेसफाई होतच नाही, परंतु पैसे काढले जातात. कोट्यवधी रुपये पाण्यात घालण्याचे काम महापालिका करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिकेकडून नालेसफाई १०७ टक्के केली असल्याचा दावा जरी केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र नालेसफाई पाहताना तो फोल असल्याचे आमदार ॲड.आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार