सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दोन बांगलादेशी घुसखोरांसह त्यांना आश्रय देणारे आणि मदत करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली

अटकेतील संशयितांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Aishwarya Dubey
  • Nov 8 2020 12:47PM

 बनावट दस्तावेजांच्या आधारे पारपत्र प्राप्त करणाऱ्या दोन बांगलादेशी घुसखोरांसह त्यांना आश्रय देणारे आणि मदत करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. अटकेतील संशयितांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबईतील साकीनाका पोलिसांनी बांगलादेशी घुसखोराला बनावट पारपत्रप्रकरणी अटक केल्यानंतर त्याचे धागेदोरे मालेगावपर्यंत आढळून आले होते. बनावट दस्तावेज आणि पारपत्र बनवून देणाऱ्या टोळीशी संबंधित शहरातील साजीद अख्तर नामक आधार कार्ड केंद्र संचालकास मुंबई पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशी सुरू असतानाच येथील पोलिसांनी राबविलेल्या शोधमोहिमेत शहरात तीन बांगलादेशी बेकायदा वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या आधारे आलम अन्सारी आणि ताहीर अली या दोघांना अनुक्रमे आयेशानगर तसेच पवारवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी केली असता आलमला शहरात घर घेऊन देण्यासाठी अश्पाक शेख मुनाफ कुरेशी (रा. हजारखोली) याने मदत केल्याचे सांगितले गेले. तसेच पारपत्र बनविण्यासाठी लागणारे जन्म प्रमाणपत्र आणि अन्य बनावट दस्तावेज तयार करण्यासाठी या दोघांना एकलाख अहमद मोहंमद मुस्तफा (रा. नयापुरा), इम्रान शेख रशीद (रा. नागछाप झोपडपट्टी), इकबाल खान मुनीर खान (रा. तंजीबनगर), ललित मराठे (रा. कैलासनगर), झाकिरअली अब्दुल मजीदखान, शेख युनूस (रा. अख्तराबाद) आणि मुदस्सीर एकलाख (रा. गुलाबपार्क) यांनी मदत केल्याचे उघड झाले.

याप्रकरणी आयेशानगर आणि पवारवाडी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून संशयितांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय जहीर हाशीम हनिबा हा अन्य एक बांगलादेशी नागरिक तसेच उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील एक संशयित ठेकेदार फरार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आजी-माजी आमदारांच्या नावांच्या पत्राचा वापर

साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्य़ातील संशयितांकडे मालेगावातील एमआयएमचे आमदार मौलाना मुक्ती इस्माईल तसेच काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांचे कोरे लेटरपॅड आढळून आले होते. आयेशा नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्य़ातील संशयितांकडेदेखील आसिफ शेख यांच्या नावाच्या लेटरपॅडवर बांगलादेशी नागरिकाचे तयार करण्यात आलेले ओळखपत्र आढळून आले आहे. शेख यांची बनावट स्वाक्षरी करून हे बनावट ओळखपत्र केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार