सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तोरणमाळला 500 फूट खोल दरीत जीप कोसऴून 6 ठार; 6 गंभीर

नंदुरबार - थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ

Nandurbar MH
  • Jan 23 2021 7:14PM
नंदुरबार - थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ येथे सुमारे 500 फूट खोल दरीत प्रवाशांसह जीप कोसळली. या धक्कादायक घटनेत 6 प्रवासी जागीच ठार झाले तर 17 जखमी झाले. जखमींपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे.
      अधिक माहिती अशी की, धडगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसरात खडकी नावाचे गाव आहे. या गावी जाण्या-येण्यासाठी तोरणमाळपासून नऊ किलोमीटर खाली दरीलगतचा रस्ता पार करावा लागतो. अलीकडेच बनवलेल्या येथील घाट रस्त्याने प्रवासी वाहने जाये करतात. अशाच प्रवासी घेऊन जाणाऱ्या जीप गाडीला आज शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता अपघात झाला. तोरणमाळ येथील खडकी पॉईंटवरून ही जीप खाली कोसळली. ही जीप गाडी मजुरांना वाहून नेण्याचे काम रोजच करते. मृत आणि जखमी सर्व मजूर प्रवासी असल्याचे सांगण्यात आले.
अपघात एवढा भीषण होता की कोसळलेल्या जीपचा फक्त सांगाडा उरला. जीप मधील महिला पुरुष आणि मुले इतस्ततः फेकली गेली. आदळले जाऊन काहीजण जागीच मरण पावले. मृतांची संख्या 10 पेक्षा अधिक असल्याची चर्चा होती. तथापि शासकीय माहितीनुसार मृतांची संख्या सहा आहे. रीमा रायसिंग नाईक 9 वर्षे, चिमा घीसा नाईक 35 वर्षे, बायजी रेलसिंग नाईक 38 वर्षे, कुचलीबाई रेलसिंग नाईक 18 वर्षे, खेकडी सायसिंग नाईक 45 वर्षे आणि रिंगाटी नाईक 25 वर्षे अशी मृतांची नावे आहेत. रेहंज्या धनश्‍या नाईक 27, शिशलू सायसिंग नाईक 7. शिलू सायसिंग नाईक 7, सुनिता सायसिंग नाईक 14, गणेश रामजी नाईक 21, गोग्या वाहऱ्या नाईक 70 हे सहाजण गंभीर जखमी असून तोरण माळ ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले आहे. अन्‍य 11 जण किरकोळ जखमी असून तोरण माळ ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन ते घरी रवाना झाले असल्याची माहिती देण्यात आली. 
      अपघाताचे ठिकाण अतिदुर्गम भागात असल्यामुळे त्याचे वृत्त पोलिसांना उशिरा मिळाले. या भागात मोबाईल रेंज नसल्यामुळे तसेच अपघातस्थळी उतरण्यासाठी योग्य मार्ग नसल्यामुळे मदत कार्यात सर्वांनाच अडथळे येत राहिले. म्हसावद पोलिस ठाण्यांत या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. म्हसावद पोलिस ठाण्याचे निरीक्षक पवार आणि सर्व कर्मचारी मदतीसाठी धावून गेले सायंकाळपर्यंत मदत कार्य चालू होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार