सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापुरात सुमारे 5 लाख कोंबड्यांची झाली कत्तल; 18 लाखाहून अधिक अंडीही केली नष्ट

नंदुरबार - अखेरीस नवापुरात बर्ड फ्लूने इतिहासाची पुनरावृत्ती घडवलीच! आठवडाभरात सुमारे 5 लाख 78 हजार कुकुट पक्षांची कत्तल पूर्ण झाली असून 18 लाख 77 हजारहून अधिक अंडी नष्ट करण्यात आली आहेत

Nandurbar. MH
  • Feb 14 2021 5:35PM
नंदुरबार - अखेरीस नवापुरात बर्ड फ्लूने इतिहासाची पुनरावृत्ती घडवलीच! आठवडाभरात सुमारे 5 लाख 78 हजार कुकुट पक्षांची कत्तल पूर्ण झाली असून 18 लाख 77 हजारहून अधिक अंडी नष्ट करण्यात आली आहेत. एकूण 10 लाख कुक्कुट पक्षी बाधित असल्याचा अहवाल आहे. 21 गावांचाही परिसर बर्ड फ्लू बाधित घोषित करण्यात आला आहे.
             नंदुरबार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार नवापुर परिसर व तालुक्यातील १ कि. मी. त्रिज्येत 4 गावे, ३ कि. मी. त्रिज्येत 7 गांवे, ५ कि. मी. त्रिज्येत 2 गांवे, १० कि. मी. त्रिज्येतील 8 गांवे अशी एकूण 21 गावं बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. नगरपालिका क्षेत्रातील पोल्ट्री फार्मची संख्या एकूण २८ आहे. या बाधीत क्षेत्रातील एकूण कुक्कुट पक्षी १० लाख २३ हजार ६२३ आहेत. तर नवापूर नगरपालिका क्षेत्रातील बाधित पोल्ट्री फार्मची संख्या २० असून एकूण बाधित कुक्कुट पक्षी ६ लाख २९ हजार २०६ ईतके आहेत. दि.७ फेब्रुवारी २०२१ पासून १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंतच्या 6 दिवसात यापैकी ५ लाख 78 हजार ८० कुक्कुट पक्षांची कत्तल करण्यात आली. तर १८ लाख ७७ हजार ८४५ अंडी नष्ट करण्यात आली.
ग्रामीण भागातील पोल्ट्री फार्मची संख्या ७ असून कुक्कुट पक्ष्यांची संख्या- २ लाख ३६ हजार ४१२ आहे. ग्रामीण भागातील बाधित क्षेत्रातील १ कि मी. ग्रज्येच्या परिसरातोल परसातील कुक्कुट पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही दिनांक ०८ फेब्रुवारी २०२१ रोजी सुरु करण्यात आलेली आहे. यासाठी ग्रामीण भागात विविध पोस्टर तसेच गाडी फिरवून पशुपालकांना प्रबोधन करण्यात येत आहे. १० कि. मी. त्रिज्येच्या परिसरातील गावामध्ये ग्रामसेवकांमार्फत सतर्कता बाळगण्या बाबत सुचित करण्यात आले आहे. तसेच मृत पक्षी आढळल्यास प्रशासनास कळविणे संदर्भात लेखी सूचनाही देण्यात आलेली आहे.
        आज दि.१3 रोजी अहमदनगर-३६, नाशिक-२६, जळगांव-१६ व स्थानिक(नंदुरबार)-१२ असे एकूण-९० जलद कृती दलामार्फत) बाधित कुक्कुट पक्षी नष्ट करण्याचे कामकाज सुरू आहे. सदर ९० जलद कृती दलात (R.R.T.) एकूण पशुधन विकास अधिकारी, वर्ग-१ - ९५ व एकूण इतर कर्मचारी ३८९ असे एकूण ४८४ अधिकारी- कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नंदुरबार यांनी ही माहिती दिली.
----------

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार