सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*नंदुरबार नवापुर न्यायालय चा ऐतिहासिक निकाल*

मास्क न लावणाऱ्यास दिली 5 दिवस कैदे ची शिक्षा

Nandurbar MH
  • Apr 14 2021 4:23PM

 

मास्क न लावणाऱ्यास दिली 5 दिवस कैदे ची शिक्षा

सुदर्शन न्यूज- केतन रघुवंशी ( नंदुरबार )

नवापूर न्यायालय: जिल्ह्यातील पहिला गुन्हा व शिक्षा.
नंदुरबार: माक्स न लावता फिरताना आढळून आल्याने नवापूर येथील जहागीर उस्मान मिर्झा रा.नवापूर याला नवापूर प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
          नवापूर येथील लाईट बाजार भागात 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जहांगीर उस्मान मिर्झा हा व्यक्ती मास न लावता फिरत होता.त्याला पोलिसांनी अडविले असताना त्याने कोरोना हवेतून पसरत नाही म्हणून मास किंवा रुमाल तोंडाला बांधणार नाही असे सांगितले. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग होईल आशा पद्धतीने वागला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला होता. त्याला नवापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. बहिरवाल यांच्या न्यायालयापुढे उभे केले. न्यायालयाने जहागीर मिर्झा याला पाच दिवस साधा कारावासाची शिक्षा व हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली. दोषारोप पत्र सहाय्यक निरीक्षक धिरज महाजन यांनी सादर केले.पैरवी अधिकारी म्हणून हवालदार प्रमोद पाठक होते. 
        निकाल देताना न्यायालयाने म्हटले आहे की, कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. संसर्ग सार्वजनिक ठिकाणी टाळता यावा म्हणून नागरिकांनी तोंडावर मास किंवा रुमाल बांधण्याबाबत संबंधित यंत्रणांनी सूचना जाहीर करूनही नागरिकांनी बेजबाबदारपणाचे वर्तन टाळावे.
सबळ कारणांशिवाय आरोपीने सदर स्वरूपाचे केलेले वर्तन हे कोरूना विषाणू संसर्ग कालावधीत गंभीर रूपाचे असल्याने जास्तीत जास्त शिक्षणाद्वारे दंडनीय ठरविणे हे कायदा व सुव्यवस्थेचे पालन वावे म्हणून आवश्यक ठरत असल्याचे म्हटले आहे.
       जिल्ह्यात मास न लावणाऱ्या वर गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा ठोठावण्याची ही पहिलीच वेळ असल्याने  खळबळ उडाली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार