सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतदारसंघ निवडणूक-2020 मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

Sudarshan MH
  • Dec 2 2020 9:50PM
 
औरंगाबाद, दिनांक 02 (अरविंद जाधव) :- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 दि.01 डिसेंबर 2020 रोजी विभागातील आठही जिल्ह्यांत पार पडली. सदरील मतदानाची मतमोजणी प्रक्रिया 03 डिसेंबर 2020 रोजी करण्यात येणार आहे. 
सदर मतमोजणी प्रक्रियेच्या विविध कामकाजासाठी मतमोजणी अधिकारी-कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम.मुगळीकर हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 तर पोस्टल बॅलेट मतमोजणी टेबल क्रमांक-1 साठी अतिरिक्त जिल्हाधिकारी जालना अंकुश पिनाटे, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर टेबल क्रमांक-2 साठी अप्पर जिल्हाधिकारी औरंगाबाद अनंत गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोजणी पर्यवेक्षक म्हणून 56 अधिकाऱ्यांची तर राखीव मोजणी पर्यवेक्षक म्हणून 24 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोजणी सहायक म्हणून 168 तर राखीव मोजणी सहायक म्हणून 22 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांना सहाय्य करण्यासाठी 11 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 याबरोबरच कोविड संदर्भात आवश्यक ती काळजी घेण्यात आली असून यासाठी आरोग्य सेवा सुविधा कक्ष, प्रसार माध्यमांना माहिती देण्यासाठी माध्यम कक्ष, सुरक्षेसंदर्भात बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा, आपत्कालिन परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार