सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महानगरपालिके मार्फत 30 ते 44 व 45 वर्ष पुढील वयोगटासाठीचे लसीकरण सात केंद्रावर होणार

30 ते 44 वर्षे वयोगटातील पहिल्या डोससाठी 50 टक्के ऑनलाईन व 50 टक्के ऑनस्पॉट लसीकरण

s.ranjankar
  • Jun 22 2021 1:58PM

लातूर दि.21 लातूर शहर महानगरपालिके मार्फत कोविड-19 लसीकरणाचे दिनांक 22 जून 2021 रोजीचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी  पुढील प्रमाणे आहे. 30 ते 44 व  45 वर्षे पुढील वयोगटासाठीचे  लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे. नागरीकांची गर्दी जास्त झाल्यास गरजेनुसार सत्र चालू होण्यापुर्वी टोकन क्रमांक देण्यात येतील,अशी माहिती लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी दिली आहे.
   विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर,दयांनद कॉलेज बार्शी रोड, लातूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (I.T.I. कॉलेज, छत्रपती शिवाजी चौक लातूर), विवेकानंद प्रा.विदयामंदिर (शिवाजी शाळा प्रांगण),लेबर कॉलनी लातूर, यशवंत शाळा प्रा.ना.केंद्र, साळे गल्ली, लातूर,प्रा.ना.आरोग्य केंद्र,राजीव नगर,विवेकानंद चौक लातूर व प्रा.ना.आरोग्य केंद्र,मंठाळे नगर, (मनपा शाळा क्र.09),लातूर  येथे कोव्हीशिल्ड  लस दिली जाणार आहे.
    45 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस (पहिला डोस घेवून 84 दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील) HCW व FLW यांचा पहिला व दुसरा डोस, कोविशिल्ड ऑनस्पॉट सकाळी 10 ते सायं.5 वाजपर्यंत राहील. 30 ते 44 वर्षे वयोगटातील पहिल्या डोससाठी 50 टक्के ऑनलाईन व 50 टक्के ऑनस्पॉट लसीकरण करण्यात येणार आहे, याची संबंधित नागरिकांनी नोंद घ्यावी.
मोबाईल पथक लसीकरण केंद्र (संबंधित परीसरातील नागरीकांसाठी) Near To Home  सुदर्शन प्राथमिक शाळा,श्रीनगर व प्रा.ना.आ.केंद्र,तावरजा कॉलनी,नवीन इमारत लातूर,45 वर्ष पुढील वयोगट कोव्हिशिल्ड लस 45 वर्षेावरील  नागरीकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस (पहिला डोस घेऊन 84 दिवस पुर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील ) HCW व FLW यांचा पहिला व दुसरा डोस ऑनस्पॉट सकाळी 10 ते सायं.5 वाजपर्यंत राहील. 
शहरातील  इतर लसीकरण केंद्र दि. 22 जून 2021 रोजी बंद राहतील याची नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार