नंदुरबार शहरातील 2 मोटर सायकली चोरीच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाकडून उकल , आरोपीसह 5 चोरीच्या मोटर सायकली जप्त
2 मोटर सायकली चोरीच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाकडून उकल , आरोपीसह 5 चोरीच्या मोटर सायकली जप्त
सुदर्शन न्युज - केतन रघुवंशी (नंदुरबार)
जिल्ह्यातील मोटर चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्याबाबत मा.निरीक्षक श्री. रवींद्र कळमकर यांना निर्देश दिलेले आहेत.
त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोहवा रवींद्र पाडवी, महेंद्र नगराळे, पोना राकेश मोरे, राकेश वसावे , पोकॉ अभय राजपूत, आनंदा मराठे यांचे पथक स्थापन करून मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा अभ्यास करुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने बातमीदार नेमण्यासाठी मार्गदर्शन केले. नमूद पथकाकडून तपास सुरु असताना दिनांक 8/8/2021 रोजी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नवापूर चौफुली परिसरात एक इसम विना कागदपत्राची मोटर सायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक कळमकर यांनी नमूद पथकास बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा लावण्यास सांगितले त्यानुसार पथकाने नवापूर चौफुली परिसरात सापळा लावून संशयित रित्या एक लाल रंगाची मोटर सायकल घेऊन फिरनाऱ्या इसमास ताब्यात घेऊन विचारपूस केली असताना त्याने त्याचे नाव - अविनाश शामू गावित वय - 28 वर्ष राहणार वाघाळे असे सांगितले. त्यास त्याच्याकडील मोटरसायकली चे कागदपत्र सांगितले असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यामुळे संशय वाढल्याने त्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कार्यालयात आणून पोलीस निरीक्षक कळमकर यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर मोटरसायकल चोरीची असल्याचे मान्य करून दिनांक 7/ 8/ 2021 रोजी हिरा वाईन शॉप समोरून चोरली सांगून इतर चार मोटरसायकली देखील चोरल्या असल्याने कबूल केले. त्याने सांगितल्यानुसार इतर 4 मोटरसायकली देखील पथकाने जप्त करून आरोपीसह एकूण 90,000/- किमतीच्या 5 मोटरसायकली जप्त करून पुढील तपासासाठी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प