सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार शहर हद्दीतुन चोरलेली ३ लाखाची बोलेरो गाडी चोरीचे गुन्ह्यातील २ आतंरराज्य आरोपी राजस्थान मधुन अटक तर चोरलेली गाडी मध्यप्रदेशातुन हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धड़क कामगिरी

२ आतंरराज्य आरोपी राजस्थान मधुन अटक तर चोरलेली गाडी मध्यप्रदेशातुन हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धड़क कामगिरी

Nandurbar MH
  • Sep 29 2021 10:35AM
नंदुरबार शहर हद्दीतुन चोरलेली ३ लाखाची बोलेरो गाडी चोरीचे गुन्ह्यातील २ आतंरराज्य आरोपी राजस्थान मधुन अटक तर चोरलेली गाडी मध्यप्रदेशातुन हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धड़क कामगिरी

दि. 18/09/2021 रोजी दुपारी 02/30 03/30 वा नंदुरबार शहरातील मनोहर सतीलाल बागुल वय 34 धंदा शेती रा. महादेव नगर जगतापवाडी नंदुरबार यांचे मालकीची 3,00,000/- रु कि. बोलेरो चार चाकी वाहन MH 20CS 2362 हो राजीव गांधीनगर प्लॉट क्र. 143 चे घरासमोरुन चोरी झाल्याने नंदुरबार शहर गुरनं 808/2021 भादवि कलम 379.34 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्ह्याचे MOB नुसार माहीती काढून गुन्हा
उघडकीस आणणेबाबत निर्देश दिले.

पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर यांनी गुन्ह्याचे पध्दतीचा अभ्यास करुन फिर्यादी यांचेकडून संशयीतांची सविस्तर माहीती घेऊन सपोनि संदिप पाटील, पोहवा प्रमोद सोनवणे, पोहवा विनोद जाधव, पोना राकेश मोरे, पोकों विजय ढिवरे, अभय राजपुत, आनंदा मराठे यांचे पथक केले. पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर व पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. सशयीतांनी फिर्यादीजवळ सोडलेले मोटर सायकलची माहीती घेतली, संपर्कासाठी वापरलेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती घेतली. सर्व माहीतीचे विश्लेषण करुन संशयीत आरोपी सध्या राजस्थान राज्यातील बारां या शहरात असल्याची खात्री केली.

त्यानुसार पथकाने दिनांक 25/9/2021 रोजी वारों हे शहर गाठले. बारां शहरात संशयीत आरोपीचा दोन दिवस शोध घेऊन गुन्ह्यातील संशयीतांना स्थानिक पोलीसांचे मदतीने एका लॉजमधुन ताब्यात घेतले. संशयीत आरोपींना गाडीबाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगण्यास नकार दिला. परंतु बारकाईने पुन्हा विश्वासात

घेऊन विचारणा केली असता गाडी काढून दिली. आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा येथे आणून गुन्ह्याबाबत सविस्तर विचारपुस केली असता सदरचे आरोपी हे गुगल मॅपवरुन वेगवेगळ्या गावांचा शोध घेऊन त्या त्या गावांना भेटी देतात. भेटीदरम्यान ते गावात एक ऑफीस स्थापन करतात त्यात मायक्रो फायनान्स कंपनी असल्याचे बॅनर लावून परिसरात कंपनीचे नाव व स्वतःचा क्रमांक असलेल्या पीवळ्या पावत्या वाटप करतात व त्याद्वारे 100/200 रुपयांमध्ये मोठा इंन्शुरन्स करण्यासाठी लोकांना आमीष देतात. त्यानंतर संपर्क करणा-या ग्राहकांना बचत गटाचे मार्फतीने 30 ते 40 हजार रुपये कर्ज मिळवून देण्यात येईल असे सांगुन प्रोसेसिंग फीचे नावाने प्रत्येकी 2 ते 3 रुपये जमा रतात. दोन तीन दिवसात जो काही रक्कम होईल ती घेऊन ते पोबारा करतात. फसवणूक होणारी वैयक्तीक रक्कम छोटी असल्याने शक्यतो कोणी पोलीसात तक्रार करीत नाही. तसेच दुस-या वेळी ज्या ठिकाणी फसवणूक केली आहे तेथुन 300 ते 1000 किमी अंतरावर दूसरे ठिकाण निवडतात त्यामुळे ते सहजासहजी पोलीसांचे जाळ्यात देखील सापडत नाहीत. त्यादृष्टीने नंदुरबार येथे देखील त्यांनी गांधी नगरमध्ये एक घर भाडेतत्वावर घेऊन त्यात सुर्योदय मायक्रो ग्रुप लिमीटेड कंपनी या नावाने ऑफीस सुरु केले होते. तथापि नंदुरबार येथे अपेक्षीत ग्राहक न मिळाल्याने त्यांनी नमुद गुन्ह्यातील फिर्यादी यांना गाडी भाडेतत्वावर घेण्याचे आमीष देऊन गाडी घेऊन पोबारा केला होता. त्यानंतर ते अशा प्रकारे फसवणूक सुरु करण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

सशयीतांकडे चोरलेल्या गाडीशिवाय 2 लॅपटॉप, 2 मोबाईल हॅन्डसेट एलएडी टिव्ही, 2 कॅम्प्युटर मॉनीटर, 10 बनावट नंबर प्लेट्स, बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्रे ड्रायविंग लायसेन्स कंपनीचे बनावट ओळखपत्रे असा एकूण 3 • लाख 48 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
        सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविद्र कळमकर, सपोनि संदिप पाटील, पोहवा प्रमोद सोनवणे, पोहचा विनोद जाधव, पोना राकेश मोरे, पोको विजय ढिवरे, अभय राजपुत, आनंदा मराठे यांचे पथकाने केली असून मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार