सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धम्मपथ...

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म प्रवर्तनासाठी नागपूरचीच निवड का केली? असा प्रश्न बहुतेकांना पडतो.

- रमेश कुलकर्णी ९९२२९०१२६२
  • Oct 24 2020 3:14PM
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म प्रवर्तनासाठी नागपूरचीच निवड का केली? असा प्रश्न बहुतेकांना पडतो. येवल्यातील भाषणात त्यांनी आपल्या भक्कम इराद्याचे अंगुलिनिर्देश दिले होते. नागपूरची निवड करताना महामानवाला नागपूरच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास होता. त्यांच्या मते, भारतात बौद्ध धम्माच्या प्रसारात नागवंशीय अग्रेसर होते. ज्यांनी बौद्ध इतिहासाचा अभ्यास केला असेल त्यांना ही बाब पटकन समजेल. नाग लोकांचं आर्यासमवेत शत्रुत्व होतं. आर्य आणि अनार्य यांच्यातील लढायांमध्ये मोठ्या प्रमाणावर नरसंहार व्हायचा. डॉ. आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भाषणातून याचा उलगडा होतो. आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखलेही पुराणात आढळतात. अगस्ती ऋषींनी त्यातून एक नागमनुष्य वाचविला. त्याचेच आपण वंशज आहोत. ज्या नाग लोकांचा इतका मानसिक छळ झाला होता त्यांना आधारासाठी कुणीतरी महापुरुष हवा होता. तथागत गौतम बुद्ध हे महापुरुषाच्या रूपात त्यांना प्राप्त झाले. त्यानंतर बुद्धाचा उपदेश जंबुद्वीपात पसरविण्याचं कार्य नाग लोकांनी केलं. नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर व आसपासच्या परिसरात होती. म्हणूनच या शहराचं ‘नागपूर’ असं नामकरण झालं. जवळच नाग नदीचा उगम व प्रवाह आहे. अर्थातच नदीचं नाव येथील स्थानिकांच्या नावावरून पडलं. जवळच नागार्जुन टेकडी आहे. अशा नागवंशीयांचा ऐतिहासिक दाखलाच नागपूर निवडीसाठीचं मुख्य कारण होतं. यामध्ये कुणाला दुखविण्याचा उद्देश नव्हता व तशी भावना नव्हती, असा विचारसुद्धा मनाला शिवला नाही, असं परखडपणे बाबासाहेबांनी ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यातील भाषणात सांगितलं होतं. मुंबई, सारनाथही पहिल्या धम्मदीक्षा सोहळ्यासाठी चर्चेत होतं. मात्र नागपूर शहर या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तनाचं साक्षीदार ठरलं. बौद्ध धम्मच का? याचं प्रतिपादन करताना महामानवानं बौद्ध संघाचं माहात्म्य विशद केलं. बौद्ध संघ हा मोठ्या सागरासारखा आहे. त्यामध्ये सर्वच प्रवाह विलीन होतात. समुद्रामध्ये आलेल्या निरनिराळ्या नद्यांचं पाणी वेगळं करणं कठीण आहे. बौद्ध संघामध्ये विलीन झालेल्या प्रवाहाची जात तेथेच संपुष्टात होते व सर्व समान पातळीवर येतात. भगवान गौतम बुद्ध हे समता सांगणारे एकमेव महापुरुष आहेत. बुद्धांची तत्त्वं अजरामर आहेत. बुद्धांनी ईश्वरीय अवताराचा धर्म असा कुठेही दावा केलेला नाही. माझे आई-वडील प्राकृत होते. हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल, तेव्हा तो तुम्ही स्वीकारावा. एवढी उदारता सांगणारा हा धर्म आहे. जगात सर्वत्र दु:ख आहे, माणसं दु:खांनी त्रस्त आहेत. त्या दु:खांतून पिळलेल्या गरीब माणसांना मुक्त करणं हेच बौद्ध धर्माचं मुख्य कार्य आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, करुणा, प्रज्ञा, ज्ञानप्राप्ती, अहिंसा, चारित्र्य, नीतिमत्ता व न्यायनिष्ठ तत्त्व हा बौद्ध धर्माचा मूळ गाभा आहे. पंचशील व अष्टांगिक मार्ग हा धम्माचा पाया आहे. मानवी संवेदना हा केंद्रबिंदू आहे. मानवी कल्याणाचं उत्थान हा ध्यास आहे. बुद्धांच्या समतेच्या जयघोषानं जगातील मानवजातीला एका सूत्रात बांधलं. जगाला तारणारा बुद्धांचा धम्म हा एकमेव मार्ग आहे, या जाणिवेतूनच बुद्धधम्माचा अनुसरणीय स्वीकार महामानवानं केला. १४ आॅक्टोबर १९५६ ला अशोका विजयादशमीच्या मंगलदिनी नागपूर, तर १६ आॅक्टोबर १९५६ ला चंद्रपूर येथे लक्षावधी अनुयायांसह दीक्षा सोहळा पार पडला. आपल्या या प्राणप्रिय नेत्यांवरील उत्कट प्रेम, निष्ठा व विश्वास दाखविणारा तो लाखोंचा मंगलसोहळा त्यामुळेच ऐतिहासिक ठरला. संपूर्ण जगभर प्रसारित असलेला; परंतु मूळ भारतीय संस्कृतीशी नाळ जोडलेला बौद्ध धम्माचा स्वीकार करून महामानवानं राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने एक पाऊल समोर टाकलं. भारतीयत्वावर निस्सीम प्रेम व राष्ट्रहिताची कास धरणारा हा भारतरत्न दूरद्रष्टा म्हणूनच असामान्य आहे. पंचशीलाचा जीवनात अंगीकार करा, असा त्यांचा संदेश होता. त्यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा आचरणात आणल्या म्हणजे खºया अर्थानं बुद्ध धम्म अनुसरला. पंचशील, अष्टांगिक मार्ग, दहा पारमिता, प्रतिज्ञा यांचं आपल्या आयुष्यातील अनुसरण किती आहे? असा प्रश्न प्रत्येक धम्मपथावरील पांथस्थानं अंतर्मुख होऊन स्वत:ला विचारण्यास काय हरकत आहे? स्वत:च प्रामाणिकपणे घेतलेला उत्तराचा शोध संविधानाचा शिल्पकार असलेल्या युगंधरास खरी आदरांजली ठरेल. त्या उत्तरातच आपला धम्मपथावरील प्रवास अधिक निकोप, निडर व निरोगी होईल यात कुठलीच शंका नाही. हेच मानवमुक्तीच्या ‘मूकनायका’ला अभिप्रेत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार