२५७ आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण
कर्मचाऱ्यांचे कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण
पालघर - ( मनीष गुप्ता ) पालघर कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणास
जिल्हाधिकारी डॉ. माणिकगुरसळ आणि जिल्हा परिषद मुख्य कार्याकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या
उपस्थितीत सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात उपजिल्हा रुग्णालयडहाणू, उपजिल्हा रुग्णालय जव्हार,ग्रामीण रुग्णालय पालघर आणि वसई - विरारमहानगरपालिका क्षेत्रात वरूण इंडस्ट्रीस या चार केंद्रांवर २५७ आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. पालघर ग्रामीण रुग्णालयात आज जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सागर पाटील यांना पहिली लस टोचून लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. उज्वला काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी तसेच इतर आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.४०० लसीकरणाचे उद्दीष्ट असून आज २५७ व्यक्तींना लस देण्यात आली. संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिकांमार्फत ही लस देण्यात आली.
जिल्ह्यात १७ हजार ४११ लाभार्थ्यांना ही लस देण्यात
येणार आहे. त्यासाठी १९ हजार ५०० डोसेस जिल्ह्यात प्राप्त झाले आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प