सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

करो.. ना बर्थ ड्डे

कोरोनाच्या जन्माची जागतिक वर्षपूर्ती झाली. चीनच्या वुहान शहरात १७ नोव्हेंबर २०१९ला कोरोनाची लक्षणं असलेला पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर हा साथरोग वेगानं पसरत असल्याचं लक्षात आलं. त्याचे ‘कोविड-१९’ हे नामकरण होण्यास २६ डिसेंबर ही तारीख उजाडली.

- रमेश कुलकर्णी ९९२२९०१२६२
  • Nov 21 2020 3:25PM
कोरोनाच्या जन्माची जागतिक वर्षपूर्ती झाली. चीनच्या वुहान शहरात १७ नोव्हेंबर २०१९ला कोरोनाची लक्षणं असलेला पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर हा साथरोग वेगानं पसरत असल्याचं लक्षात आलं. त्याचे ‘कोविड-१९’ हे नामकरण होण्यास २६ डिसेंबर ही तारीख उजाडली. कोरोनाच्या भयंकर स्वरूपाची माहिती जगजाहीर करणाºया चिनी संशोधक डॉ. ली वेनलियांगचा अचानक झालेला मृत्यू संशय निर्माण करून गेला. खोटारड्या चीननं प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वुहान शहरात लॉकडाउनची घोषणा केली. त्याची कडक अंमलबजावणी झाली. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली; परंतु त्यास उशीर झाला होता. वुहान शहरातील चायनीज व्हायरस जागतिक भ्रमंतीसाठी केव्हाच उडाला होता. त्यानंतरचे बदललेले भयावह स्वरूप व दुष्परिणाम आपण आजही अनुभवतोय. कोरोना आपल्याकडे येऊच शकत नाही. देशात आला तरी महाराष्ट्रात येऊ शकत नाही. महाराष्ट्रात आला तरी गावात येऊ शकत नाही. गावात आला तरी आमच्या गल्लीत येऊ शकत नाही. गल्लीत आला तरी घरात येऊ शकत नाही, अशा भाबड्या आशावादी स्वभावानं सर्वांचाच घात केला. प्रत्यक्षात कोरोनानं प्रत्येक गाव, बिल्डिंग, गल्ली गाठलीच. देश व राज्यातील कडक उपाययोजना कोरोनाला पूर्णपणे प्रतिबंध करू शकल्या नाहीत हे गंभीर वास्तव समोर आले. मागील मार्चपासून कोरोनाचाच बोलबाला होता. वृत्तपत्र, टीव्ही, सोशल मीडिया कोरोनामय झाला होता. घराघरांत, मनामनांत फक्त कोरोना वास करीत होता. कोरोनाच्या बचावाचे सल्ले न मागता फु कट मिळत होते. हाच खरा उपाय म्हणून निमूटपणे तो सल्ला अमलात आणला जात होता. भारतात एवढी मोठी लोकसंख्या असूनही आपण कसा कोरोना थांबविला, आपली रोगप्रतिकारकशक्ती किती मजबूत आहे, आपला मृत्युदर कसा कमी आहे? यासाठी पाठ थोपटून घेण्याची स्पर्धा वा चढाओढ जनतेनं अनुभवली. प्रत्यक्षात कोरोनाचे ‘साइड इफेक्ट्स’ दीर्घकाळ मनावर कोरले गेल्याचे दाहक सत्य समोर आले आहे. जागतिक पटलावर बलाढ्य वाटणारे देश कुचकामी ठरलेत. शिस्तशीर वाटणाºया त्यांच्या आरोग्य व्यवस्था किती गलथान आहेत याचं विद्रूप दर्शन जगासमोर आलं. जगाची झालेली वाताहत हृदय पिळवटून टाकणारी ठरली. मानवी मर्यादेची जागतिक लक्ष्मणरेखा यानिमित्तानं अधोरेखित झाली. दीर्घकाळ जग थबकलं होतं. इतिहासात न घडलेल्या अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडल्यात. जग असहायपणे त्याचे मूकसाक्षीदार बनले. आर्थिक, मानसिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय या सर्वच क्षेत्रांत कोरोनाचे झटके अनुभवले गेलेत. वेगवान उलथापालथी दररोज घडत होत्या. मानवी हुंकार, संवादाची परिभाषा बदलली गेली. जिवलगाच्या अंत्यसमयीची अनुपस्थिती जिवाला कायमचा घोर लावून गेली. पार्थिवांची स्मशानातील ‘वेटिंग’ पीडादायक ठरली. अंत्यदर्शनाची नवी ‘डिजिटल’ रीत समोर आली. बहुतांश लोकांचे रोजगार जाऊन आर्थिक आवक शून्यावर आली तर काही ठिकाणी कोरोना कमाईचे साधन ठरले. हॉस्पिटल्स, ट्रॅव्हल्स, व प्रशासनातील लुटीच्या घटना मानवी मन थिजवून गेल्यात. माणुसकी हरवल्याच्या व्यथित करणाºया अशा घटना समोर येत असतानाच सामाजिक मदतीचा गहिवर सुखावून गेला. धर्माच्या भिंतीपल्याड मदतीसाठी समोर आलेले असंख्य दृश्य, अदृश्य हात सांत्वना देऊन गेले. सामाजिक मानवी संयम व सहिष्णुता सुखावून गेली. सामाजिक स्वच्छतेची सवय व शिस्त प्रफुल्लित करणारी ठरली. कोरोनाची दुसरी लाट येण्याचा इशारा दुर्लक्षित करून चालणार नाही. घाबरून जाण्याची अजिबात गरज नसली, तरी प्रतिबंधक उपायांची कडक अंमलबजावणी करावी लागेल. सध्या दिसत असलेल्या सामाजिक बेफिकिरीला थोडा लगाम लावावा लागेल.बिनधास्तपणाला मुरड घालावी लागेल. परिपूर्ण कोरोना लस येण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या जागतिक महामारीच्या फ्लू, इन्फ्लुएन्झा या रोगांसारखी कोरोनाची सवय करून घ्यावी लागणार आहे. कोरोना दीर्घकाळ वास्तव्यास असेल, अशी वैद्यकीय जाणकारांना भीती आहे. आता पूर्वीसारखे कडक लॉकडाउन अशक्य आहे. उलट सर्वच अनलॉक होण्याची प्रक्रिया वेगवान राहील. त्यामुळे आपली काळजी आपल्यालाच घ्यावयाची आहे. कोरोनाला एकाकी पाडून त्यालाच ‘आयसोलेशन’मध्ये ठेवण्याचा संकल्प करावा लागणार आहे. मार्गदर्शक सूचनांचा आदर करीत निरोगी आरोग्य ठेवणं ही पण वेगळ्या प्रकारची राष्ट्रभक्ती व सेवा ठरणार आहे. जाता जाता : दिवाळीमधील आर्थिक उलाढाल सुखावणारी ठरली. अर्थतज्ज्ञांच्या आर्थिक अंदाजाला चकमा देत बाजारपेठेने घेतलेली उसळी उत्साहदर्शक होती. गृह, खाद्य, इलेक्ट्रॉनिक्स, सुवर्ण, खादी व आॅटोमोबाइलमधील विक्रमी खरेदीने आनंद द्विगुणीत झाला. शेअर मार्केटची उसळी आशादायक ठरली. एकूणच छोट्या-मोठ्या व्यापारी, उद्योजकांना आशेचा किरण दाखविणारी दीपावली अनपेक्षित समाधान देणारी ठरली. बाजारपेठेतील तेजीची हीच नांदी ठरावी, अशी आशा करण्यास हरकत नाही. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार