सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*प्रायोगिक तत्त्वावर दहावी-बारावीची शाळा सुरू होणार.*

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरू होण्यास अडचणी आल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करून शिक्षण सुरु करणे गरजेचे आहे. यासाठी 10 वी, 12 वीचे वर्ग 5 ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे.

Snehal Joshi
  • Jul 11 2020 8:30PM
राज्यातील कोरोनाचा पार्श्वभूमीवर तयार झालेली आपत्कालीन परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरू होण्यास अडचणी आल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करून शिक्षण सुरु करणे गरजेचे आहे. यासाठी 10 वी, 12 वीचे वर्ग 5 ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. तसेच 21 जुलैपासून पाचवीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती शालेय  शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांंनी दिली. दरम्यान, पहिली, दुसरीच्या ऑनलाईन शिक्षणावर बंदी आहे. तर सक्तीने शुल्क वसुली करणार्‍या शाळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. खासगी शाळांनी सर्व वर्गाचे ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. यामुळे खासगी आणि शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विषमता वाढेल, यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाच्या शाळाही सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात दहावी आणि बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील एक शाळा सुरू55 करण्याचे नियोजन करावे. शाळा सुरू करण्यासाठी येणार्‍या अडचणी दूर करून इतरही ठिकाणच्या शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा अभिप्राय घेण्यात यावा. यासाठ्ी त्रयस्थ म्हणून गावातील सरपंच किंवा समिती सदस्यांमची मदत घ्यावी, असे ते म्हणाले. प्रत्यक्ष शिक्षण पद्धती इतर कोणत्याही पयार्यापेक्षा जास्त प्रभावी आहे. परंतु सद्यस्थिती लक्षात घेता इतर वर्गाच्या शाळा ऑनलाईन सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. अमरावती विभागात सुमारे 1 लाख 19 हजार विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही. त्यांच्यापर्यंत कशाप्रकारे शिक्षण पोहोचविता येईल, याचाही विचार होणे गरजेचे आहे. शिक्षण देण्याच्या ण्याच्या इतर पद्धती सुचविण्यात याव्यात. ज्याठिकाणी शाळा सुरु झाल्या आहेत. त्याठिकाणी किती अभ्यासक्रम शिकविण्यात आला आहे. याबाबततही अहवाल मागविण्यात यावा. तसेच विलगीकरणासाठी शाळा उपयोगात आणल्या आहेत. या शाळा पुन्हा ताब्यात घेतेवेळी निजर्तुंकीकरण करून घ्याव्या लागतील. असेही ते म्हणाले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार