सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*प्रतिक्षा संपली दहावी बोर्डाचा निकाल उद्या लागणार*

अखेर जाहीर केली. उद्या म्हणजेच 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहाता येणार आहे. mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Snehal Joshi .
  • Jul 28 2020 4:45PM
महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर केली. उद्या म्हणजेच 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहाता येणार आहे. 1 जुलैच्या पुर्वी दहावीचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपुर्वी दिली होती. अखेर सर्व विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली . कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे 3 मार्च ते 23 मार्च या कालावधीत होणाऱ्या महाराष्ट्र एसएससी परीक्षांवर त्याचा परिणाम जाणवून आला होता. दहावीच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा म्हणजेच भुगोलचा पेपर रद्द करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला होता. २१ मार्च रोजी इतिहासाचा पेपर घेण्यात आला होता आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे भुगोलचा पेपर लांबणीवर पडला होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (एमएसबीएसएचई) यापूर्वी जाहीर केले होते की भूगोल विषयाच्या पेपरसाठी परीक्षेच्या इतर विषयांत मिळणार्‍या सरासरी गुणांच्या आधारे गुण दिले जातील. अधिकृत वेबसाइटवर निकाल कसा पाहाल… 1) mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 2) तिथे असलेल्या “SSC Examination Result 2020” या ऑप्शनवर क्लिक करा. 3) तिथे तुम्हाला विचारलेली माहिती सबमिट करा. 4) तुम्हाला तुमच्या नावे असलेला रिसल्ट समोर दिसेल. 5) आलेल्या माहितीमध्ये तुमचं नाव आणि तुमचा सिट नंबर तपासून पाहा.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार