सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कराडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

आज सोमय्या कोल्हापूरला भेट देणार होते. पहाटे 4.30 च्या सुमारास पोलिसांनी कराडमध्ये ताब्यात घेतलं

Sudarshan MH
  • Sep 20 2021 10:21AM

भाजप नेते किरीट सोमय्या  राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केलेत. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांना साताऱ्यातील कराड रेल्वे स्थानकावरुन पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं. आज सोमय्या कोल्हापूरला भेट देणार होते. पहाटे 4.30 च्या सुमारास पोलिसांनी कराडमध्ये ताब्यात घेतलं. कोल्हापूर आणि सातारा पोलिसांनी ही संयुक्तरित्या कारवाई केली आहे. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे सरकार इतकं घाबरलं आहे की मला कोल्हापूरला जाण्यास बंदी घातली अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी दिली आहे. तसंच कोल्हापुराला जाऊन मला आंबेमातेचे दर्शन करायचं आहे. आज मी कराडमध्ये उतरत आहे. पण पुढच्या दोन दिवसांत मी कोल्हापुराला जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान किरीट सोमय्या थोड्याच वेळात पत्रकार परिषदे घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा बाहेर काढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नेमका हा घोटाळा काय असेल याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देणार आहेत. किरीट सोमय्या यांना या संदर्भात कोल्हापूरमध्ये जाऊन पाहणी करायची होती. मात्र रोखल्यामुळे ते कराडमध्येच पत्रकार परिषदेत या संदर्भातली माहिती देणार असल्याचं समजतंय.

 

किरीट सोमय्यांनी Tweet करुन दिली माहिती

" पोलिसांनी मला निषेधाच्या आदेशान्वये कराड येथे थांबवले. मी आज सकाळी 9 वाजता कराड सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार"

 

दुसरीकडे काल रात्री सोमय्या कोल्हापूरला महालक्ष्मी एक्स्प्रेसने रवाना झाले. त्यानंतर रात्री सव्वाबाराच्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकावर दाखल झाली. यावेळी पुणे रेल्वे स्थानकावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी किरीट सोमय्या यांचं अभिनंदन करत जोरजोरात घोषणाबाजी केली.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार