सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात, पायी घरी जाणाऱ्या 10 लोकांना बसनं चिरडलं

: देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसायांना टाळं लागलं. त्यामुळे रोजगार नसल्यानं मजूर आपल्या गावी परतत आहेत. याच दरम्यान रात्री उशिराच्या सुमारास एक मोठा भीषण अपघात झाला. पायी जाणाऱ्या मजुरांना एका बसनं चिरडल्याची धक्कादायक घटना मुजफ्फरनगर-सहारनपूर राज्याच्या महामार्गावर घडली आहे

Aishwarya Dubey
  • May 14 2020 9:29AM

मुजफ्फरनगर, 14 मे : देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसायांना टाळं लागलं. त्यामुळे रोजगार नसल्यानं मजूर आपल्या गावी परतत आहेत. याच दरम्यान रात्री उशिराच्या सुमारास एक मोठा भीषण अपघात झाला. पायी जाणाऱ्या मजुरांना एका बसनं चिरडल्याची धक्कादायक घटना मुजफ्फरनगर-सहारनपूर राज्याच्या महामार्गावर घडली आहे. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास 10 प्रवाशांना या बसनं चिडल्याची माहिती मिळाली. त्यापैकी 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण जखमी आहेत.

गंभीर जखमी असलेल्या 4 जणांवर मेरठ मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पंजाबहून आपल्या घरी पायी निघालेल्या मजुरांवर काळानं घाला घातला. या दुर्घटनेनंतर अंधाराचा फायदा घेऊन बस चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. मृतक आणि जखमी कामगार बिहार प्रांतातील गोपाळगंज जिल्ह्यातील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबहून रात्री उशिरा मजुरांचा एक गट सहारनपूरमार्गे मुझफ्फरनगरकडे पायी प्रवास करत निघाला होता. घलौली चेकपोस्टपासून काही अंतरावर असलेल्या रोहाना टोल प्लाझाजवळ भरधाव येणाऱ्या बसनं या मजुरांना चिरडलं. घटनेनंतर बस घटनास्थळी सोडून चालक फरार झाला आहे. पोलिसांकडून या दुर्घटनेसंदर्भात चौकशी आणि फरार बस चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार