सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळा बाबत लवकरच निर्णय घेऊ उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कोमटी समाजाला आश्वासन

*यवतमाळ प्रतिनिधी किरण मुक्कावार* आर्य वैश्य (कोमटी) समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास

Sudarshan MH
  • Jul 10 2021 11:26AM


*यवतमाळ प्रतिनिधी किरण मुक्कावार* आर्य वैश्य (कोमटी) समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीला दिले असल्याचे कळते कोमटी समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाने आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे म्हणून समाजाचे नेते नंदकुमार लाभसेटवार फडणवीस सरकारच्या काळापासून प्रयत्नात होते त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर, नांदेड, लातूर येथे आंदोलन करण्यात आली तसेच अधिवेशन काळातही आंदोलन करण्यात आले पण शासनाकडून दखल घेतल्या जात नव्हती दरम्यान नंदकुमार लाभसेटवार यांच्या नेतृत्वाखाली आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती महाराष्ट्राचे गठन करण्यात आले. अभिजीत चिद्दरवार, सुरेंद्र कोडगीरवार, गजानन बेलगमवार, ब्रह्मानंद चक्करवार यांचा समावेश असलेल्या समितीने पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक यांची भेट घेतली आपल्या समाजाच्या रास्त मागणी बाबत त्यांना अवगत केली त्यानुसार इंद्रनील नाईक यांनी पुढाकार घेत कोमटी समाजाच्या शिष्टमंडळासह अजित पवार यांची भेट घेतली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री दालनात बुधवार रोजी झालेल्या या भेटीत आमदार इंद्रनील नाईक यांनी संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार लाभसेटवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्र्यांना याविषयी निवेदन देण्यात आले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ बाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्‍वासन आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीला दिल्याचे कळते यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार लाभसेटवार सुरेंद्र कोडगिरवार अभिजीत चिद्दरवार ब्रह्मानंद चक्करवार गजानन बेलगमवार सर उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार