सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नागापूर (प) येथे शिक्षकांची प्रेरणा कार्यशाळा संपन्न

*प्रतिनिधी किरण मुक्कावार-* यवतमाळ जिल्हा परिषदेतील उमरखेड पंचायत समिती अंतर्गत

Sudarshan MH
  • Jul 10 2021 11:14AM


 *प्रतिनिधी किरण मुक्कावार-*   यवतमाळ जिल्हा परिषदेतील उमरखेड पंचायत समिती अंतर्गत आयएसओ मानांकित जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नागापूर (प) येथील राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य चितांगराव कदम यांच्या संकल्पनेतून शिक्षकांची प्रेरणा कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने तर प्रमुख उपस्थिती जि प यवतमाळ चे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर ,अमरावती विभागाचे सेवानिवृत्त उपायुक्त संभाजी राणे, यवतमाळ जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी ,नांदेड येथील सुप्रसिद्ध डॉ अंकुश देवसरकर ,उमरखेड नगर परिषदेचे शिक्षण सभापती प्रकाश दुधेवार, उमरखेड पंचायत समिती सदस्य गजानन सोळंके,यवतमाळचे निमंत्रित शिक्षण समिती सदस्य मधुकर काठोळे, माजी प्राचार्य डॉ वि ना कदम, पं स उमरखेडचे  गटशिक्षणाधिकारी पांडुरंग खांडरे ,माजी गटशिक्षणाधिकारी एन आर वड्डे, उमरखेड पंचायत समितीच्या माजी सभापती सविताताई कदम, नागापूरचे उपसरपंच गोदाजी जाधव व अनेक मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत गीत नागापूर शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रकाश शिंदे व त्यांच्या संगीत संचानी सादर केले. यानंतर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आनंद देशमुख यांच्या अधिकारी घडवा घरोघरी या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. उमरखेड पंचायत समितीमधील सर्व जि प शाळांना ही पुस्तके मोफत देण्याचा मानस आनंद देशमुख सर यांनी व्यक्त केला. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक यवतमाळ जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सदस्य व ज्यांच्या संकल्पनेतून ही प्रेरणा कार्यशाळा संपन्न झाली असे चितांगराव कदम यांनी केले. एनसीआरटी मार्फत आयसीटी पुरस्कार  प्राप्त शिक्षक शेख शफी यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेमध्ये पंचायत समिती पुसद येथील जिल्हा परिषद शाळा जगापुर ने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जगदीश जाधव व त्यांच्या टीमचे स्वागत करण्यात आले. मागील वर्षी यवतमाळ जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व कोरोना काळात संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिशन जेएनव्ही अंतर्गत नवोदय परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केल्यामुळे नागापूर येथील शिक्षक बालाजी कदम यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या मनोगतामधून नांदेड येथील डॉ अंकुश देवसरकर यांनी शाळेचे व गावाचे कौतुक करत सर्वांना शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त उपायुक्त संभाजी राणे यांनी अनेक शैक्षणिक उपक्रमांची माहिती आपल्या मार्गदर्शनातून शिक्षकांना दिली. यवतमाळ जि प चे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी या प्रकारचे कार्यक्रम शिक्षकांना प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. निमंत्रित शिक्षण समिती सदस्य मधुकर काठोळे यांनी  शिक्षकांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या व नागापूर शाळेला पुन्हा शिक्षकांसह भेट देण्याचा मानस व्यक्त केला. उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांनी शिक्षण क्षेत्रात या प्रकारचे प्रेरणादायी कार्यक्रम होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी महादीप उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागापूर शाळेतील शिक्षक डॉ विनय चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन गटशिक्षणाधिकारी पांडुरंग खांडरे यांनी केले. यानंतर कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या शिक्षक व पालकांना श्रद्धांजली अर्पण करून सामुहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख अनिल बोपीनवार,  शाळेतील शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील पदाधिकारी तसेच समस्त नागापूर वासीयांनी परिश्रम घेतले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार