*संभाजीनगरमधील गुंठेवारीची घरे नियमित होणार, सुमारे चार लाख नागरिकांना दिलासा*l
गुंठेवारीची घरे नियमित होणार, सुमारे चार लाख नागरिकांना दिलासा*l
संभाजीनगर शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गुंठेवारीचा प्रश्न आज अखेर मार्गी लागला. शहरातील ११८ वसाहतींमधील सुमारे सव्वा लाख घरांना नियमित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे चार लाख नागरिकांना दिलासा मिळाला आहे. माझ्यासह पालकमंत्री सुभाष देसाई, शिवसेना आमदार, पदाधिकारी यांनी वारंवार पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला.
संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील अनधिकृतपणे विकसित झालेली गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठी आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. या निर्णय़ामुळे 3१ डिसेंबर २०१५ पर्यंत बांधण्यात आलेली गुंठेवारीतील सुमारे सव्वा लाख घरे नियमित होणार आहेत.
गेली अनेक वर्षे गुंठेवारीतील घरे नियमित करण्याचा प्रश्न प्रलंबित होता. यासाठी संभाजीनगरचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक घेतल्या. त्यांच्या या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प