सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

‘ही बाई कायम रागात असते’; जया बच्चन झाल्या ट्रोल

सेल्फी काढणाऱ्या चाहत्याला जया बच्चन यांनी गाडीवरुन मारला धक्का; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

Sudarshan MH
  • Apr 9 2021 11:57AM

जया बच्चन या आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतात. चित्रपटांसोबतच त्या राजकारणातही सक्रिय आहेत. त्यामुळं त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळं अनेकदा राजकीय वादंग निर्माण होतं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणूकीची रणधूमाळी सुरु आहे. अन् या रणधुमाळीत जया बच्चन TMC पक्षासाठी प्रचार करताना दिसत आहेत. अलिकडेच त्यांनी एका प्रचार रॅलीतही भाग घेतला होता. मात्र या रॅलीत त्यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चाहत्याला धक्का मारुन खाली ढकललं. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळं जया बच्चन यांना ट्रोल केलं जात आहे.

 

 

 

जया बच्चन ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये प्रचार करत आहेत. मात्र या प्रचार रॅली त्यांच्या अगलट आल्या आहेत. त्यांनी सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला धक्का मारुन खाली ढकलंल्यामुळं सध्या त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. ही खडूस बाई कायम रागातच असते. जनतेशी संपर्क ठेवायचा नाही तर प्रचारसभेत येताच का? ही बाई कायम लोकांचा अपमान करते अशा आशयाचे ट्विट करुन संतापलेले नेटकरी सध्या जया बच्चन यांना ट्रोल करत आहेत. या ट्रोलिंगवर जया बच्चन यांनी अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार