सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नागपूरची मेट्रो जगातील सर्वोत्कृष्ट : ना. गडकरी

शहर सुंदर करताना प्रकल्पांची ‘ओनरशिप’ घ्या ‘बेटर दॅन द ड्रीम’ पुस्तकाचे विमोचन आता झाडांचे प्रत्यारोपण करणार, तोडणार नाही

Snehal Joshi .
  • Feb 19 2022 8:43PM
नागपूरची मेट्रो ही जगातील सर्वोत्कृष्ट मेट्रो बनली आहे. मेट्रोचे डिझाईनही उत्तम आहे. मेट्रोचे ब्रिजेश दीक्षित यांनी या कामात चांगल्या नेतृत्वाचा परिचय दिला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पाच्या खर्चात त्यांनी खूप बचत केली आहे. याच मेट्रोबद्दलची माहिती व इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून नागपूरकरांपर्यंत पोहोचेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
एबीपी माझाच्या विदर्भाच्या संपादक सरिता कौशिक यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, नवभारचे सुनील तिवारी, तरुण भारतचे गजानन निमदेव, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, प्रदीप मैत्र प्रामुख्याने उपस्थित होते. प्रेस क्लब येथे हा कार्यक्रम आज पार पडला.
आगामी काळात तंत्रज्ञानाचा वापर करून मेट्रोच्या दोन पिलरमधील अंतर 30 मीटरपेक्षा अधिक कसे करता येईल यासाठी स्टील फायबरचा वापर करण्याचा मनोदय व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- हा आमचा रस्ता, हा आमचा बगिचा असा आपलेपणा आमच्यात हवा. प्रत्येक प्रकल्पाची ‘ओनरशिप’ घेतली गेली पाहिजे. हा जिव्हाळा निर्माण झाला तेव्हाच प्रकल्प यशस्वी होतील. फुटाळा येथील म्युझिकल फाऊंटेनचे कामही चांगले झाले आहे. 4000 लोक बसतील एवढी मोठी गॅलरी आहे. 300 कोटी रुपये मी दिले आहे. जगात नाही ते नागपुरात हवे असा माझा नेहमी प्रयत्न असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.
तेलंखेडी बगिचा येथे सर्व प्रकल्पाचे गुलाब पुष्प असणारी झाडे आणण्याचा आपला प्रयत्न आहे. 3 हजार वाहनांचे पार्किंग होऊ शकते. कल्पना अनेक आहे, लोकांच्या सूचनांचीही गरज आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- मुंबई दिल्ली 1 लाख कोटींचा द्रूतगती महामार्ग 2 वर्षात पूर्ण होत आहे. पण 2 कोटींचा केळीबाग रोड 6 वर्षापासून मी पूर्ण करू शकत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
नवीन प्रकल्प आता बीओटी किंवा पीपीपीतून उभे झाले पाहिजे, असे सांगताना मेट्रोचे उत्पन्न वाढावे यासाठीही आपण प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. अजनी मल्टीमोडल प्रकल्पासाठी 1200 कोटी मंजूर झाले आहे. पण आता हा प्रकल्प रद्द केल्यासारखा आहे. यापुढे झाडे तोडायचे नाही तर झाडांचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. दिल्लीजवळ द्वारका एक्सप्रेस वे बांधताना हजारो झाडांचे आम्ही प्रत्यारोपण केले आहे. तसेच मेट्रोचे सर्व पिलरवर जेवढे नृत्यप्रकार आहेत, त्यांचे चित्र किंवा योगासनाची सर्व चित्रे रंगविली जावीत असा माझा प्रयत्न आहे. यामुळे पाहणार्‍यांना प्रोत्साहन मिळेल, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- शहराला सुंदर करण्यासाठी आणखी खूप करण्यासारखे आहे. फक्त सर्वांनी त्या प्रकल्पाची ‘ओनरशिप’ घेतली पाहिजे. तसेच जनतेचा आणि माध्यमांचा पाठिंबा आणि सहकार्य मिळाले काम चांगले होऊ शकते. मेट्रोच्या कामाचे श्रेय हे कुण्या एकट्याचे नाही. या प्रकल्पात काम करणार्‍या लहानांपासून सर्वांचे आहे. सरिता कौशिक यांनी अभ्यास करून हे पुस्तक लिहिले. मेट्रोचा हा इतिहास शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षाही ना. गडकरी यांनी व्यक्त केली.


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार