सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बंजारा समाजाच्या हितासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात पंकजा मुंडेंना पाठिंबा

समाज हिताच्या विरोधात आपली भूमिका कधीही राहणार नाही - रविकांत राठोड...

Shruti Patil
  • May 6 2024 1:13PM

बीड: बंजारा समाजाचे युवा नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेश सरचिटणीस रविकांत राठोड यांनी लोकसभा निवडणुकांत माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या गटात जाहीर प्रवेश करत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना बिनशर्त पाठिंबा देत लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.

यामुळे त्यांच्यावर विरोधकाकडून बिन बुडाचे आरोप होत असून समनक जनता पक्षातून हकालपट्टी केली असल्याची चर्चा समाज माध्यमातून होताना दिसत आहे. त्या पक्षाचे प्राथमिक सदस्य नसताना तो पक्ष हकालपट्टी कसा करू शकतो असा सवाल उपस्थित करत बंजारा समाजाच्या हितासाठी आपण पंकजाताई मुंडे यांना बिनशर्त पाठिंबा दिला असून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात सक्रियपणे काम करणार असल्याचे बंजारा समाजाचे नेते व नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्ही.जे.एन.टी सेलचे राज्यप्रमुख रविकांत राठोड यांनी बीड येथे हॉटेल नीलकमल येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

बंजारा समाजासाठी पोहरादेवी गड सर्वात महत्त्वाचा मानला जातो या गडामधून आलेला आदेश समाज बांधव कधीही नाकारू शकत नाही. एकीकडे बंजारा समाजाने आपली भूमिका ठरवली आहे. राज्यातील बंजारा समाज हा महायुतीकडे वळलेला आहे. बीडमध्ये ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीशी बंजारा समाज खंबीरपणे उभा होता. खासदार प्रीतम ताई मुंडे यांनाही बंजारा समाजाने साथ दिली होती. या ही लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या पाठीशी बंजारा समाज एकजुटीने उभा राहिला आहे. आपण वेगळी भूमिका मांडली होती लोकसभेत आपण अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. समाज हितासाठी व गडावरील आलेला आदेश आपण टाळू शकत नव्हतो.

समाज एकीकडे व आपण एकीकडे यामुळे समाजाचे प्रचंड नुकसान झाले असते यामुळे आपण लोकसभा निवडणुकीतून माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना आपण पाठिंबा दिलेला आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता समाज हितासाठी आपण पंकजा मुंडे यांना बिनशर्त पाठिंबा दिला असून समाज माध्यमातून उठवलेल्या अफवावर विश्वास न करता बंजारा समाजाने एकजुटीने पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेमध्ये रविकांत राठोड यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार