पॅरिस: श्रीरामचरितमानस आणि पंचतंत्र यांचा ‘युनेस्को’च्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टर’मध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता श्रीरामचरितमानस आणि पंचतंत्र हे जागतिक स्तरावर सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा म्हणून ओळखले जातील.
वर्ष २०२४ मधील आवृत्तीत आशिया पॅसिफिकमधील २० वारसास्थळांचा समावेश आहे, ज्यांत श्रीरामचरितमानस आणि पंचतंत्र यांच्या हस्तलिखितांचा समावेश आहे. अनेक भारतीय नागरिक गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेल्या श्रीरामचरितमानसचे पठण करतात, तसेच लहानपणापासून पंचतंत्राच्या कथा ऐकतात. ‘युनेस्को’च्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’चा उद्देश जगातील सर्व मुख्य सांस्कृतिक वारसांचे जतन करणे, हा आहे.