सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महिलांनी सक्रियपणे मतदानात सहभाग नोंदवावा - जिल्हा निवडणूक अधिकारी

बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये 55 महिला मतदान केंद्र राहतील.

Shruti Patil
  • May 3 2024 5:27PM
बीड: महिलांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात प्रगती साधली आहे. मतदारांमध्ये जनजागृतीचे कामही महिला उत्कृष्टपणे पार पाडीत आहे. बीड लोकसभा मतदार संघातील निवडणूका सोमवार दिनांक 13 मे ला होणार आहेत. यामध्ये महिलांनी निसंकोचपणे स्वविवेकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.
 
बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये 55 महिला मतदान केंद्र राहतील. या मतदान केंद्राच्या ठिकाणी महिला अधिकारी कर्मचारी राहतील. महिलांचा मतदानात सक्रिय सहभाग असावा यासाठी स्तनदा माता, गरोदर महिला, लहान बालके असलेले आई यांच्यासाठी मतदान केंद्रावर तात्पुरत्या अंगणवाड्या उभारण्यात येत आहेत. या ठिकाणी पाळणा लहान मुलांसाठी, खेळणे असणार आहेत. स्तनदा माता आपल्या बाळांना याठिकाणी दूध पाजू शकतात. आपल्या लहान बालकांना तिथे ठेवून मत द्यायला जाऊ शकतात, गरोदर माता तिथे काही काळ आराम करू शकतात. अशी तयारी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

 

महिलांमध्ये कोणतही काम चोखपणे करण्याची जिद्द चिकाटी, ध्येय असते. एकही महिला मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासन काम करीत आहे आपण पुढे येऊन मतदान करा.
 
प्रशासनातील महिला अधिकारी टक्का वाढवण्यासाठी प्रयत्नरत
जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे या स्वतः दिवस-रात्र काम करून बीड लोकसभा मतदार संघातील मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे, यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात सर्वच अधिकारी कर्मचारी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तयारीत आहेत.

 

यासह बीड विधानसभा मतदार संघातील सहाय्यक निवडणूक अधिकारी कविता जाधव यादेखील अधिकाधिक मतदान विधानसभा मतदारसंघात व्हावे, यासाठी तयारीला लागल्या आहेत. कायदा सुव्यवस्था नीट राहावी, याकरीता आंबेजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके या सज्ज आहेत. 
 महिलांनी मतदानाच्या दिवशी सक्रिय राहावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक संगीता देवी पाटील यादेखील प्रयत्न करत आहेत.

 

माजलगाव तालुक्याच्या तहसीलदार वर्षा मनाळे, तहसील मध्ये निवडणुकीची प्रक्रिया नीट व्हावी यासाठी कार्यरत आहेत.
नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे बीड नगरपालिकेत मतदानाच्या प्रचार प्रसाराचे जोमाने काम करीत आहेत.

 

माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या सदस्य सचिव तथा मीडिया कक्षाच्या प्रमुख अंजू निमसरकर या माध्यमांवर करडी नजर ठेवून आहेत. माध्यमात येणाऱ्या आचारसंहिता भंगाच्या तसेच पेड न्यूज संदर्भातील बातम्यांवर वॉच ठेवून आहेत. 
यासह तहसीलदार तेजस्विनी जाधव आणि सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती वसुधा रघाताटे या ही निवडणुकीच्या जबाबदाऱ्या कर्तव्यपूर्णरित्या पार पडत आहेत. याशिवाय विविध विभागातील निवडणुकीची प्रक्रिया पार पडणाऱ्या अधिनस्ताच्या आदेशाचे काटेकोरपणे महिला कर्मचारी पालन करीतआहेत.
या सर्व महिला अधिकाऱ्यांनी व महिला कर्मचाऱ्यांनी आवाहन, केले आहे बीड लोकसभा मतदारसंघातील महिलांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार