सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अहिल्यानगर येथील दुय्यम कारागृहात बंदीवानांना विशेष सुविधा मिळत असल्याची माहिती; प्रशासनावर प्रश्नचिन्ह!

अहिल्यानगर येथील दुय्यम कारागृहात बंदीवानांना विशेष सुविधा मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.

Shruti Patil
  • May 2 2024 8:42AM

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात असलेल्या दुय्यम कारागृहात काही बंदीवानांना मद्य, भ्रमणभाष, अमली पदार्थांसह व्हीआयपी सुविधा मिळत असल्याची माहिती कारागृहातील काही बंदीवानांकडून मिळाली आहे. कोपरगाव तहसील कार्यालयाच्या जवळ असलेल्या दुय्यम कारागृहाचे नुकतेच नूतनीकरण झाले असून प्रत्येक बरॅकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत, असे असतांनाही विविध गंभीर गुन्ह्यांतील बंदीवानांकडे भ्रमणभाष असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांमधून पोलीस आणि कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हा प्रकार गंभीर असून खरचं कारागृहात अशा प्रकारच्या व्हीआयपी सुविधा आरोपींना मिळत आहेत का ? याची चौकशी वरिष्ठ प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे. मागील वर्षी कारागृहामध्ये विविध अमली पदार्थ आढळले होते आणि त्या वेळी तत्कालीन पोलीस अधिकार्‍याने सदर प्रकरण दाबले असल्याचीही चर्चा आहे. कारागृहात अमली पदार्थांसह व्हीआयपी सुविधा उपलब्ध होत असेल, तर हे त्यांना कोण पुरवत आहे? याची माहिती पोलीस आणि कारागृह प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कारागृहात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे साहाय्य प्रशासनाने घ्यावे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार