मालेगाव: केंद्र शासनाने निर्यात सरसकट खुली केल्यानंतरही कांद्याच्या बाजारभावात अपेक्षेप्रमाणे वाढ होत नसल्याने, शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. किरकोळ वाहनातील कांद्याला दोन हजारांवर भाव मिळत आहे. बहुतांशी कांदा १२०० ते १७०० रुपयांदरम्यान विकला जात आहे.
परिणामी कांदा बाजारात आणण्यास शेतकरी आखडता हात घेत आहेत. लोकसभा निवडणूक प्रचारात कांदाप्रश्नी शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्याचे पाहून, निर्यातबंदी उठविण्यात आली. कांदा प्रश्न कधी मार्गी लागणार? याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.