सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

इंडोनेशियामध्ये शीत लाव्हाचा कहर; ५२ जणांचा मृत्यू तर २४९ घरे उद्ध्वस्त

मान्सून आणि मारापी पर्वतावर थंड झालेल्या लाव्हामुळे मोठे भूस्खलन झाले आहे.

Shruti Patil
  • May 15 2024 9:55AM

वृत्तसंस्था: इंडोनेशियातील पश्चिम सुमात्रा येथे शीत लाव्हाचा पूर आला आहे. त्यात ५२ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ३००० हून अधिक लोकांना सुरक्षा स्थळी पाठविण्यात आले आहे. या ठिकाणी अचानक आलेल्या पुरामुळे मोठा विध्वंस पाहायला मिळाला आहे. मान्सून आणि मारापी पर्वतावर थंड झालेल्या लाव्हामुळे मोठे भूस्खलन झाले आहे. शनिवारी मध्यरात्रीपूर्वीच नदीला पूर आला. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

 
इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर मुसळधार पाऊस आणि ज्वालामुखीच्या उतारावरून थंड लाव्हामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे बेटावर अचानक पूर आला. या पुरात ५२ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून ४५ जणांची ओळख पटली आहे, तर २४९ घरे उद्ध्वस्त झाली आहेत. कोल्ड लाव्हाच्या पुरामुळे १२ हून अधिक लोक बेपत्ता झाल्याचे समोर आलं आहे. पश्चिम सुमात्रा प्रांतातील चार जिल्ह्यांतील गावे उद्ध्वस्त झाली आहेत. यांचा स्थानिक बचावकर्ते, पोलीस आणि लष्काराकडून सातत्याने शोध सुरू आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार