सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा प्रसार; केपी २ व्हेरियंटचे पुण्यात ५१, तर ठाण्यात २० रुग्ण

पुण्यामध्ये केपी २ कोरोना व्हेरियंटचे ५१ रुग्ण आढळून आले, तर ठाण्यामध्ये २० रुग्ण व उर्वरीत महाराष्ट्रात २० रुग्ण आढळले आहेत.

Shruti Patil
  • May 15 2024 9:46AM
मुंबई: जगावरील कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही तेच कोरोना व्हेरियंटचा प्रसार वाढला आहे. यापूर्वी जेएन १ व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली होती, आता केपी २ व्हेरियंट जगभरात आणि देशात पसरू लागला आहे. या व्हेरियंटने राज्यातही पाय पसरले आहेत. महाराष्ट्रात कोविड - १९ उपप्रकारचे ९१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हे कोव्हिड १९ ओमिक्रॉनचे सबव्हेरियंट केपी. २ आहे.
 
देशात सर्वत्र लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचाराच्या राजकीय तोफा धडाडत असतांना, आरोग्य विभाग मात्र कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला थांबविण्यासाठी व्यस्त झाले आहे. देशभरात या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातही या रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यामध्ये केपी २ कोरोना व्हेरियंटचे ५१ रुग्ण आढळून आले, तर ठाण्यामध्ये २० रुग्ण व उर्वरीत महाराष्ट्रात २० रुग्ण आढळले आहेत. या नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण जगात जानेवारी महिन्यात अमेरिकेत आढळला होता.
 
महाराष्ट्राचे जीनोम सिक्वेन्सिंग को - ऑर्डिनेटर डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च व एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या राज्यात दिसून आली होती. पण लोकांना रुग्णालयात दाखल करण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. पुणे व ठाणे सोडून सात रुग्ण अमरावती व औरंगाबाद शहरांमध्ये आढळून आले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार