सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बाबाजी भक्तपरिवाराच्या पाठिंब्यासाठी उमेदवारांची वेरुळात बाबाजीची भेट; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणार पाठिंबा जाहीर

उमेदवार इम्तियाज जलील व संदीपान भुमरे यांच्या सोबत बंद दरवाजा आड चर्चा झाल्याचे समजले...

Shruti Patil
  • May 10 2024 9:28AM
रत्नपुर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारानी बुधवारी वेरुळ येथे श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजाची भेट घेवून जय बाबाजी भक्त परिवाराचा पाठिंबा मिळावा अशी विनंती केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जय बाबाजी भक्त परिवाराची राजकीय दृष्ट्या निर्णय घेण्यासंदर्भात महत्त्वाची मीटिंग बुधवारी आयोजित केलेली होती. 
 
या निमित्ताने श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांची श्री क्षेत्र वेरूळ येथे उपस्थिती होती यादरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उमेदवार श्री संदिपानजी भुमरे, विद्यमान खासदार इम्तियाज जलील, अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत, अपक्ष उमेदवार जेके जाधव साहेब, अपक्ष उमेदवार संजय भास्कर शिरसाट व शिर्डी मतदार संघातील अपक्ष उमेदवार श्री भारत संभाजी भोसले या सर्वांनी बाबाजींचे आशीर्वाद घेतले बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये सात मतदारसंघांमध्ये पाठिंबा देण्यासंदर्भाचे निर्णय अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दिनांक दहा तारखेला घेण्यात येणार असून तो निर्णय सर्व प्रसिद्धी माध्यमांना अधिकृतपणे कळवण्यात येईल आज कुठल्याही उमेदवारा संदर्भात पाठिंबाचा निर्णय झालेला नाही असे जय बाबाजी भक्त परिवाराचे वतीने राजकीय समितीचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी कळविले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार