सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

इंदूरमध्ये हिंदू धर्म स्वीकारून ‘हैदर’वरून ‘हरिनारायण’ झालेल्या तरुणाच्या घरावर आक्रमण; हरिनारायणला ठार मारण्याची धमकी!

या तक्रारीविषयी पोलिसांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

Shruti Patil
  • May 4 2024 10:06AM

मध्यप्रदेश: मध्यप्रदेश मधील इंदूर शहरातील खजराना पोलीस ठाण्याच्या परिसरात काही दिवसांपूर्वी ७ जणांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. यानंतर यांच्यापैकी एक असलेल्या हरिनारायण (आधीचा हैदर) या तरुणाच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केली. यात त्याच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. तसेच हरिनारायण याला ठार मारण्याच्या धमक्याही मिळत आहेत. अशा परिस्थितीत घाबरलेल्या हरिनारायण याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून संरक्षणाची मागणी केली आहे.

या तक्रारीविषयी पोलिसांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी विश्‍व हिंदू परिषदेचे प्रांत संपर्क प्रमुख संतोष शर्मा यांनी सांगितले की, या धमकीबद्दल सांगायचे, तर ही धमकी महाराष्ट्रातील एका इस्लामी संघटनेने दिली आहे. तेथून धमकीचे पत्र देण्यात आले आहे. यामध्ये हरिनारायणला ‘काफिर’ म्हटले आहे. आम्ही आमचे काम करत आहोत आणि करत राहू. हिंदु धर्मात आणण्याचे काम चालू राहील. धमकी देणार्‍या संघटनांवर बंदी घातली पाहिजे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार