सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

परळीची व्यापार पेठ समृद्ध व अर्थसंपन्न ठेवण्यासाठी शाश्वत विकासाची गॅरंटी देणाऱ्या पंकजाताईला मतदान रुपी आशीर्वाद द्या - धनंजय मुंडे

धनंजय मुंडेंनी परळीतील व्यापारी बांधवांशी संवाद साधला.

Shruti Patil
  • May 4 2024 9:38AM
परळी वैद्यनाथ: परळीची व्यापार पेठ ही वर्षानुवर्षे उत्कर्षाकडे वाटचाल करताना दिसते आहे. मागील काही वर्षांमध्ये परळीच्या अवतीभोवती विणले जात असलेले राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, रेल्वे वाहतूक, त्याचबरोबर नव्याने झालेली एमआयडीसी, तिथे येणारे उद्योग या सर्वांचा उहापोह करता परळीची व्यापार पेठ ही अधिक समृद्ध आणि अर्थसंपन्न होणार असून याकरिता केंद्र व राज्य सरकारची भक्कम साथ आपल्याला लागणार आहे. त्यामुळे व्यापार पेठीची अर्थसंपन्नता वाढवायच्या दृष्टीने शाश्वत विकासाची गॅरंटी देणाऱ्या पंकजाताई च्या पाठीशी सर्व व्यापारी बांधवांनी आपल्या सर्व शक्तीनिशी उभे राहावे व मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी येथे व्यापारी संवाद बैठकीमध्ये बोलताना केले आहे. 
 
परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे यांच्या पुढाकारातून बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ परळीतील विविध सर्व व्यापारी बांधवांची संयुक्त बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत धनंजय मुंडे यांनी सर्व व्यापारी बांधवांशी संवाद साधला. 
 
परळीची कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यातील निवडक श्रीमंत बाजार समिती यापैकी एक आहे. तुटीच्या खोऱ्यातील बीड जिल्ह्याच्या हक्काचे 42 टीएमसी पाणी बीड जिल्ह्यासाठी आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात असलेल्या कोरडवाहू शेतीचे रूपांतर बागायती शेतीत होईल त्याचबरोबर वाढते आधुनिकीकरण व अभियांत्रिकीच्या युगात झपाट्याने होत असलेल्या विकासामध्ये परळीची व्यापार पेठ देखील अधिकाधिक समृद्ध होईल असे वातावरण आपल्याला तयार करायचे आहे त्यासाठी संसदेमध्ये पहिल्या ओळीत बसणारा वजनदार खासदार आपला असावा असेही यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले. सर्व व्यापारी बांधवांनी सर्व शक्तीनिशी पंकजाताईंच्या पाठीशी मतदान रुपी आशीर्वाद उभे करावेत असे आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार